नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 10 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात 30 हजार 549 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 422 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 30 हजार 549 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 422 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 887 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 17 लाख 26 हजार 507 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 8 लाख 96 हजार 354 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 25 हजार 195 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 4 हजार 958 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 47 कोटी 85 लाख 44 हजार 114 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 30,549
देशात 24 तासात डिस्चार्ज – 38,887
देशात 24 तासात मृत्यू – 422
एकूण रूग्ण – 3,17,26,507
एकूण डिस्चार्ज – 3,08,96,354
एकूण मृत्यू – 4,25,195
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,04,958
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 47,85,44,114
गेल्या 24 तासातील लसीकरण – 61,09,587
India reports 30,549 new #COVID19 cases, 38,887 discharges & 422 deaths in last 24 hours as per Union Health Ministry
Total cases: 3,17,26,507
Total discharges: 3,08,96,354
Death toll: 4,25,195
Active cases: 4,04,958Total Vaccination: 47,85,44,114 (61,09,587 in last 24 hours) pic.twitter.com/lkS8eBMZh9
— ANI (@ANI) August 3, 2021
संबंधित बातम्या :
लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बाहेर फिरण्याची परवानगी मिळणार?132
(New 30549 Corona Cases in India in the last 24 hours)