नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 12 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 30 हजार 941 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एकट्या केरळमध्येच 19,622 म्हणजे जवळपास दोन तृतीयांश नवे रुग्ण सापडले असून राज्यात 132 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर कालच्या दिवसात देशात 350 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत असून आता 3.7 लाखांच्या पारच आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची धाकधूक वाढत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 30 हजार 941 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 350 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 36 हजार 275 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 27 लाख 22 हजार 121 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 59 हजार 680 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 38 हजार 560 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 70 हजार 640 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 64 कोटी 5 लाख 28 हजार 644 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 30,941
देशात 24 तासात डिस्चार्ज – 36,275
देशात 24 तासात मृत्यू – 350
एकूण रूग्ण – 3,27,22,121
एकूण डिस्चार्ज – 3,19,59,680
एकूण मृत्यू – 4,38,560
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,70,640
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 64,05,28,644
गेल्या 24 तासातील लसीकरण – 61,47,286
India reports 30,941 fresh COVID-19 cases, 36,275 recoveries, and 350 deaths in the last 24 hours
Active cases: 3,70,640
Total recoveries: 3,19,59,680
Death toll: 4,38,560Vaccination: 64,05,28,644 pic.twitter.com/dVyKCg4cep
— ANI (@ANI) August 31, 2021
कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भिती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे
संबंधित बातम्या :
कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज