नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 10 हजारांनी वाढ झाली. कालच्या दिवसात 35 हजार 178 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 440 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या सध्या चार लाखांच्या खालीच आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 35 हजार 178 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 440 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 37 हजार 169 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 22 लाख 85 हजार 857 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 85 हजार 923 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 32 हजार 519 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 67 हजार 415 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 56 कोटी 6 लाख 52 हजार 30 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 35,178
देशात 24 तासात डिस्चार्ज – 37,169
देशात 24 तासात मृत्यू – 440
एकूण रूग्ण – 3,22,85,857
एकूण डिस्चार्ज – 3,14,85,923
एकूण मृत्यू – 4,32,519
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,67,415
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 56,06,52,030
गेल्या 24 तासातील लसीकरण – 55,05,075
India reports 35,178 new #COVID19 cases, 37,169 recoveries and 440 deaths in the last 24 hrs, as per Health Ministry.
Total cases: 3,22,85,857
Total recoveries: 3,14,85,923
Active cases: 3,67,415
Death toll: 4,32,519Total vaccinated: 56,06,52,030 (55,05,075 in last 24 hrs) pic.twitter.com/NttrUIFE74
— ANI (@ANI) August 18, 2021
संबंधित बातम्या :
कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच, आतापर्यंत 5 कोटी डोस दिले
सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?