नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 12 हजारांनी वाढ झाली. कालच्या दिवसात 37 हजार 593 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 648 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या सध्या सव्वातीन लाखांच्या खाली गेली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 37 हजार 593 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 648 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 34 हजार 169 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 25 लाख 12 हजार 366 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 17 लाख 54 हजार 281 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 35 हजार 758 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 22 हजार 327 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 59 कोटी 55 लाख 4 हजार 593 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 37,593
देशात 24 तासात डिस्चार्ज – 34,169
देशात 24 तासात मृत्यू – 648
एकूण रूग्ण – 3,25,12,366
एकूण डिस्चार्ज – 3,17,54,281
एकूण मृत्यू – 4,35,758
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,22,327
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 59,55,04,593
गेल्या 24 तासातील लसीकरण – 61,90,930
भारत में पिछले 24 घंटों में कोरोना वायरस के 37,593 नए मामले आए, 34,169 रिकवरी हुईं और 648 लोगों की कोरोना से मौत हुई। #COVID19
कुल मामले: 3,25,12,366
सक्रिय मामले: 3,22,327
कुल रिकवरी: 3,17,54,281
कुल मौतें: 4,35,758
कुल वैक्सीनेशन: 59,55,04,593 pic.twitter.com/gWTEvbI1YJ— ANI_HindiNews (@AHindinews) August 25, 2021
संबंधित बातम्या :
भारतात झायडस कॅडिला लसीच्या वापरास मंजुरी, आपत्कालीन वापरास DCGI कडून मंजुरी