Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, कोरोनाबळींचा आकडाही 500 च्या खाली

| Updated on: Jul 19, 2021 | 10:16 AM

गेल्या 24 तासात भारतात 38 हजार 164 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 499 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 660 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, कोरोनाबळींचा आकडाही 500 च्या खाली
corona virus
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 3 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 38 हजार 164 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 499 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 38 हजार 164 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 499 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 660 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 11 लाख 44 हजार 229 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 3 लाख 8 हजार 456 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 14 हजार 108 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 21 हजार 665 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 40 कोटी 64 लाख 81 हजार 493 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 38,164

देशात 24 तासात डिस्चार्ज – 38,660

देशात 24 तासात मृत्यू – 499

एकूण रूग्ण – 3,11,44,229

एकूण डिस्चार्ज – 3,03,08,456

एकूण मृत्यू – 4,14,108

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,21,665

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 40,64,81,493

24 तासात लसीकरण झालेली संख्या – 13,63,123

संबंधित बातम्या :

12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिलासा, कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण

Haath Safe Rakho | लसीकरणाआधीही, नंतरही… हात स्वच्छ धुवा, TV9 नेटवर्क आणि बिस्लेरी हँड प्युरिफायरची मोहीम

(New 38164 Corona Cases in India in the last 24 hours)