नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 2 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 41 हजार 157 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 518 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 41 हजार 157 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 518 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 42 हजार 004 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 11 लाख 06 हजार 65 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 2 लाख 69 हजार 796 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 13 हजार 609 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 22 हजार 660 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 40 कोटी 49 लाख 31 हजार 715 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 41,157
देशात 24 तासात डिस्चार्ज – 42,004
देशात 24 तासात मृत्यू – 518
एकूण रूग्ण – 3,11,06,065
एकूण डिस्चार्ज – 3,02,69,796
एकूण मृत्यू – 4,13,609
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,22,660
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 40,49,31,715
24 तासात लसीकरण झालेली संख्या – 51,01,567
India reports 41,157 new COVID cases, 42,004 recoveries, and 518 deaths during the last 24 hours
Active cases: 4,22,660
Total discharges: 3,02,69,796
Death toll: 4,13,609Total vaccination: 40,49,31,715 pic.twitter.com/b3uiGSvpNL
— ANI (@ANI) July 18, 2021
संबंधित बातम्या :
12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिलासा, कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण
(New 41157 Corona Cases in India in the last 24 hours)