नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 9 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 43 हजार 733 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 930 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. (New 43733 Corona Cases in India in the last 24 hours)
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 43 हजार 733 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 930 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 47 हजार 240 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 6 लाख 63 हजार 665 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 97 लाख 99 हजार 534 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 4 हजार 211 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 59 हजार 920 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 36 कोटी 13 लाख 23 हजार 548 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 43,733
देशात 24 तासात डिस्चार्ज – 47,240
देशात 24 तासात मृत्यू – 930
एकूण रूग्ण – 3,06,63,665
एकूण डिस्चार्ज – 2,97,99,534
एकूण मृत्यू – 4,04,211
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,59,920
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 36,13,23,548
India reports 43,733 new #COVID19 cases, 47,240 recoveries, and 930 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 3,06,63,665
Total recoveries: 2,97,99,534
Active cases: 4,59,920
Death toll: 4,04,211Total vaccinated: 36,13,23,548 pic.twitter.com/kINBbaKa8A
— ANI (@ANI) July 7, 2021
संबंधित बातम्या :
लसीकरणानंतरचे साईड इफेक्ट्स दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!
भारताची नवी कोरोना लस ZyCov-D, तीन डोस घ्यावे लागणार, सुई विना लसीकरण, वाचा सविस्तर
(New 43733 Corona Cases in India in the last 24 hours)