नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत दीड हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 50 हजार 40 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 258 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. (New 50040 Corona Cases in India in the last 24 hours)
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 50 हजार 40 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 258 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 57 हजार 944 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 2 लाख 33 हजार 183 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 92 लाख 51 हजार 29 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 95 हजार 751 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 86 हजार 403 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 32 कोटी 17 लाख 60 हजार 77 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 50,040
देशात 24 तासात डिस्चार्ज – 57,944
देशात 24 तासात मृत्यू – 1,258
एकूण रूग्ण – 3,02,33,183
एकूण डिस्चार्ज –2,92,51,029
एकूण मृत्यू – 3,95,751
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 5,86,403
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 32,17,60,077
एका दिवसातील लसीकरण – 64,25,893
भारत में #COVID19 के 50,040 नए मामले आने के बाद कुल पॉजिटिव मामलों की संख्या 3,02,33,183 हुई। 1,258 नई मौतों के बाद कुल मौतों की संख्या 3,95,751 हो गई है।
57,944 नए डिस्चार्ज के बाद कुल डिस्चार्ज की संख्या 2,92,51,029 हुई। देश में सक्रिय मामलों की कुल संख्या 5,86,403 है। pic.twitter.com/arpldxDPmW
— ANI_HindiNews (@AHindinews) June 27, 2021
संबंधित बातम्या :
संभाव्य तिसऱ्या लाटेआधीच लहान मुलांसाठी गुड न्यूज, पुण्यात सीरम Covovax ची चाचणी सुरु करणार
Special Report | डेल्टा विषाणूचा धोका , पण लसीच एक्का!
(New 50040 Corona Cases in India in the last 24 hours)