नवी दिल्ली: कोरोनाचा पराभव झाला असं वाटत असतानाच आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूनं धुमाकूळ घालायला सुरुवात केलीय. त्याला गेल्या काही दिवसात न्यू नावानं ओळखलं गेलं. पण जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ओमीक्रॉन असं नाव दिलेलं आहे. कोरोनाचा हा नवा अवतार दुसऱ्या लाटेतल्या डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचं जाणकारांचं म्हणनं आहे. अजून तरी आपल्याकडे ओमीक्रॉनची लागण झालेला एकही रुग्ण मिळालेला नाही. पण तो सापडणारच नाही असं सांगता येत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारसह राज्य सरकारांना अलर्ट रहायला सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर तर सतर्क रहाणं अत्यंत गरजेचं आहे.
काय आहे नेमका ओमीक्रॉन (Omicron) विषाणू?
ओमीक्रॉन (B.1.1.529 ) हा कोरोनाचाच नवा प्रकार आहे आणि तो डेल्टापेक्षा जास्त घातक आहे. विशेष म्हणजे तो सतत बदलत रहातो. चालू महिन्यात आफ्रिकेतल्या बोत्सवाना देशात तो पहिल्यांदा सापडला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, मोझंबिक, इस्टोनियासह सहा देशात त्याची लागण झालेले रुग्ण मिळाले. गेल्या आठवड्याभरात नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही अडीच हजारापेक्षा जास्त झालीय. हा विषाणू वेगानं फैलावतो आणि त्याचा संसर्गही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं निदर्शनात आलंय. विशेष म्हणजे लस घेतलेली असेल तरीसुद्धा ओमीक्रॉनचा संसर्ग होत असल्याचं अभ्यासात स्पष्ट झालंय. त्यामुळेच दुसऱ्या लाटेत मृत्यूचं तांडव करणाऱ्या डेल्टापेक्षाही ओमीक्रॉनचा धोका अधिक आहे.
South Africa’s health minister says, based on a small sample of Omicron cases, the majority of hospital patients are unvaccinated: “It indicates that the vaccines are providing protection”
— BNO Newsroom (@BNODesk) November 26, 2021
कुठे काय घडतं आहे?
आफ्रिकेत नव्या कोरोनाचा स्फोट झाल्यानंतर इंग्लंड, इस्त्रायनं सहा आफ्रिकन देशातून येणाऱ्या विमानांवर बंद घातलीय. ज्यात दक्षिण आफ्रिका, नामीबिया, झिम्बाब्वे, लिसोथो, एसवानिटी देशांचा समावेश आहे. पोर्तुगालमध्ये जिथं जगातलं सर्वाधिक लसीकरण झालंय, तिथेही रुग्ण जास्त सापडल्यामुळे आणीबाणी घोषीत केलीय. निर्बंध लादलेत. झेक रिपब्लिकमध्ये लॉकडाऊनची स्थिती येताना दिसतेय. जर्मनी, फ्रान्स, अमेरीकेतही नव्या रुग्णांचा आकडा लाखात जातोय. त्यामुळेच नव्या कोरोनानं जगाला पुन्हा एकदा धडकी भरलीय.
Germany reports 381 new coronavirus deaths, the biggest one-day increase since March, and 72,157 new cases – @risklayer
— BNO Newsroom (@BNODesk) November 26, 2021
नव्या कोरोनाची तपासणी कशी होणार?
आफ्रिकेतल्या जवळपास सर्वच देशात हा विषाणू सापडतो आहे. जर्मनीत तर मृत्यूचं तांडव निर्माण झालंय. रुग्णसंख्या 72 हजाराच्या पुढे गेलीय तसच 381 नव्या मृत्यूची नोंद केली गेलीय. फ्रान्समध्येही 34 हजार नवे कोरोना रुग्ण सापडलेत. हे सगळे आकडे भीती निर्माण करणारे आहेत. हा विषाणू एवढाच घातक असेल तर त्याची तपासणी कशी होते हा प्रश्नही साहजिकच पडतो. तर त्याचं उत्तर आहे, आता जसा तपास होतो तसाच नव्या कोरोनाचीही तपासणी होईल. त्यामुळे नव्या विषाणूसाठी नवी तपासणी पद्धत अजून तरी गरजेची नसल्याचं जाणकार सांगतायत. त्यामुळे RTPCR टेस्टनेच तपासणी होईल. खर्च वाढण्याची शक्यता नाही.
हे सुद्धा वाचा:
शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजीवर जोर, द्वैभाषिक धोरण लागू करण्याचे वर्षा गायकवाडांचे निर्देश
Boost Metabolism : चयापचय दर वाढवण्याचे ‘हे’ सोपे मार्ग, वाचा सविस्तर!
Pune ST Strike | पुण्यात फक्त खासगी गाड्यांची वाहतूक, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच