दूध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दूध हे एक सुपरफूड आहे. दुधात भरपूर पोषक घटक असतात. ज्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि निरोगी चरबी यांसारखे आवश्यक बहु-पोषक घटक आढळतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. याशिवाय स्नायू ही मजबूत होतात, शरीर सक्रिय राहते आणि मनही तीक्ष्ण होते. व्हिटॅमिन डी मेंदूचे कार्य सुधारते. पण असं असताना अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की ते सकाळी रिकाम्या पोटी दूध पिऊ शकतात का? चला तर मग जाणून घेऊया दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?
तुम्ही सकाळी दूध प्यावे की रात्री ही तुमची वैयक्तिक निवड असू शकते. पण सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणे हे व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीवर आणि दुधाच्या प्रकारावर देखील अवलंबून असते.
सकाळी दूध प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. सकाळी दूध प्यायल्याने कमकुवत हाडांना जीवदान मिळते आणि स्नायू मजबूत होतात. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी सकाळी दूध जरूर प्यावे.
काही लोकांना दुधापासून लॅक्टोजची समस्या असू शकते, ज्यामुळे पोटदुखी, अतिसार किंवा गॅस होऊ शकतो. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने ॲसिडीटी किंवा पोटात जळजळ होऊ शकते. ज्या लोकांना रिकाम्या पोटी दूध प्यायचे आहे त्यांनी गरम दुधाऐवजी थंड दूध प्यावे जेणेकरुन पचनसंस्था आणि ॲसिडिटीशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत.
तुम्ही सकाळी दूध पिऊ शकता पण ते पिण्यापूर्वी काही फळे किंवा नाश्ता करा. दूध कधीही रिकाम्या पोटी पिऊ नका, ते जेवणासोबत प्या. कमी चरबीयुक्त किंवा स्किम्ड दूध पिणे चांगले आहे, विशेषतः जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा हृदयाच्या आरोग्याची काळजी असेल. रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे देखील फायदेशीर ठरू शकते, कारण यामुळे झोप सुधारण्यास मदत होते. तसेच गरम दूध हळद मिसळून प्या.