नवी दिल्ली: आपल्यापैकी बहुतेक व्यक्ती या आयुष्य सुरळीत चालवण्याचा प्रयत्न करत असतात. काही जण चांगल्या आयुष्यासाठी व्यवसाय करतात, तर काही लोक नोकरी करून पैसे कमावतात आणि घर चालवतात. जबाबदाऱ्यांचे ओझे असल्यामुळे अनेक व्यक्तींना रात्रपाळीतही काम (Night Shift) करावे लागते. बहुतांश व्यक्ती रात्री झोपलेल्या असताना काही लोकांना त्याच वेळेस उठून आपलं काम पूर्ण (work) करावं लागतं. मात्र, (रात्रपाळीचा) असा नित्यक्रम (night shift work culture) सातत्याने पाळल्याने शरीर हे आजार किंवा आरोग्याच्या समस्यांचे (health problems) माहेरघर बनू लागते. तुम्हीही रात्रपाळीत काम करतात का ? तसं असेल तर या कारणामुळे कोणकोणते आजार वा आरोग्याच्या समस्या होऊ शकतात ते जाणून घेऊया.
अनेक संशोधन किंवा अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की. जे लोक रात्री जागून काम करतात त्यांना इतर व्यक्तींपेक्षा अधिक बिघडलेल्या मानसिक आरोग्याचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते, रात्री काम करणाऱ्या व्यक्तींच्या मनाच्या केमिकलवर वाईट परिणाम होतो. तसेच मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने कामावरही परिणाम होतो. जे लोक या (रात्रपाळीच्या) दिनचर्येचे पालन करतात त्यांनी दररोज १० मिनिटे मेडिटेशन केल्यास ते आपले मानसिक आरोग्य निरोगी ठेवू शकतात.
इंग्रजी वेबसाइट वेबसाइट वेबएमडी मध्ये छापून आलेल्या बातमीनुसार, ज्या व्यक्तील रात्रपाळीचे वर्क कल्चर फॉलो करतात त्यांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो. रात्री काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये दर पाच वर्षांनी हार्ट ॲटॅकचा धोका काही टक्क्यांनी वाढतो, अशी माहिती एका अभ्यासात देण्यात आली आहे. खरंतर, बिघडलेल्या जीवनशैलीमुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि अशा परिस्थितीत हृदयरोग होऊ शकतो.
नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना मेटाबोलिक सिंड्रोमचा धोका असतो. या स्थितीत, उच्च रक्तदाब (High BP), उच्च साखर (High Sugar Level), वजन वाढणे आणि आणि कोलेस्ट्रॉलची पातळी बिघडणे यासारख्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. रात्री काम करणाऱ्या व्यक्तींना जागं राहावं लागलं तरी ते त्यांच्या आहाराची काळजी घेऊनही निरोगी राहू शकतात. त्यासाठी रात्री गरम पाणी प्यावे आणि शक्य तितकं हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करावा.
रात्री काम करणाऱ्या व्यक्तींना ऊन मिळत नाही. ऊन हे व्हिटॅमिन डी चा सर्वाच उत्तम स्त्रोत मानला जातो. पुरेसं ऊन न मिळाल्याने शरीरात इतर त्रासही होऊ शकतात. रात्रभर काम करणाऱ्यांनी, काही वेळ तरी उन्हात घालवता येईल असा प्रयत्न केला पाहिजे.
(टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)