आता मागणीनुसार आरोग्य सेवा, नाशिकच्या त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स आणि एम फाईनची सुरुवात

| Updated on: Dec 09, 2023 | 7:30 PM

एम फाईन जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्समधील बाजारपेठेतील उच्च स्थानी असलेले नाव आहे. ए आय संचलित, मागणीनुसार आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म म्हणून उभे आहे. वापरकर्त्यांना उच्च दर्जाच्या एकात्मिक आरोग्य सेवा आणि अत्याधुनिक आरोग्य व्यवस्थापन साधने आणि ट्रॅकर्समध्ये अखंड प्रवेश देण्यास एम फाईन कटिबद्ध आहे.

आता मागणीनुसार आरोग्य सेवा, नाशिकच्या त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स आणि एम फाईनची सुरुवात
Trimurti Diagnostics
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक | 9 डिसेंबर 2023 : शहरातील प्रसिद्ध त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटरच्या संयुक्त विद्यमाने संस्कृतीचा समृद्ध वारसा असलेल्या नाशिक शहरात एम फाईनची सुरुवात हा मैलाचा दगड आणि आरोग्य सेवांमध्ये एक नवीन पैलू आहे. एम फाईनची स्थापना 2017 मध्ये करण्यात आली होती. मागणीनुसार आरोग्यसेवा देणारा हा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे मागणी केल्यास कुणालाही आरोग्य सेवा मिळण्याची सुविधा निर्माण झाली आहे. अचूक निदान आणि आरोग्य तपासणी आणि इतर सेवा एम फाईनकडून दिली जाते. घर किंवा ऑफिसमध्ये याचा आरामात लाभ घेता येतो. एम फाईनने एका क्लिकवर सर्व समावेशक आरोग्य सेवांची एक नवीन व्याख्या केली आहे.

त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटर, 2005 मध्ये स्थापन झालेले आहे. नाशिकच्या रहिवाशांना अतिविशिष्ट निदान आणि पॅथॉलॉजी सेवा प्रदान करण्यासाठी हे सेंटर आधारस्तंभ आहे. गेल्या 18 वर्षांपासून समाजाची सेवा करत असलेले त्रिमूर्ती डायग्नोस्टिक सेंटर हे नाशिकच्या आरोग्य सेवेतील एक विश्वासार्ह नाव बनले आहे.

सुलभ आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवांचे महत्त्व ओळखून, एम फाईनने त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटरशी सहयोग केला आहे. या सहयोगाचे उद्दिष्ट नाशिकच्या रहिवाशांसाठी सर्वसमावेशक हेल्थकेअर सोल्यूशन्स आणणे, रुग्णांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा सहज मिळू शकतील याची खात्री करणे हे आहे. एम फाईन आणि त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटर एकत्रितपणे नाशिकमधील हजारो रुग्णांसाठी आरोग्य सेवा अनुभव वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.

लाइफसेल इंटरनॅशनल प्रा.लिचे एमडी आणि सीईओ. मयूर अभया एम फाईन आणि त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटर यांच्यातील प्रभावी युतीचे कौतुक केले आहे. एम फाईनच्या अखंड ग्राहक अनुभवासह 4500 पेक्षा अधिक चाचण्या आणि त्रिमूर्तीचे प्रादेशिक कौशल्य असलेली ही पार्टनरशीप शहरातील आरोग्य सेवेत क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळेच आरोग्यसेवेचे भविष्य एम फाईनमध्येच आहे, असं मयूर अभया यांनी म्हटलंय.

त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटरचे कन्सल्टंट रेडिओलॉजिस्टव डॉ. प्रमोद अहिरे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही गेली 18 वर्षे नाशिकला सेवा देत आहोत आणि आता एम फाईनच्या सहकार्याने, आम्ही डायग्नोस्टिक सेवांच्या विस्तृत श्रेणीसह प्रगत पॅथॉलॉजी मेनू ऑफर करणार आहोत, असं डॉ. प्रमोद अहिरे यांनी स्पष्ट केलं.

एम फाईनबद्दल

एम फाईन जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्समधील बाजारपेठेतील उच्च स्थानी असलेले नाव आहे. ए आय संचलित, मागणीनुसार आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म म्हणून उभे आहे. वापरकर्त्यांना उच्च दर्जाच्या एकात्मिक आरोग्य सेवा आणि अत्याधुनिक आरोग्य व्यवस्थापन साधने आणि ट्रॅकर्समध्ये अखंड प्रवेश देण्यास एम फाईन कटिबद्ध आहे. त्याच्या ISO 27001 प्रमाणपत्राद्वारे ओळखले जाणारे हे हेल्थ-टेक प्लॅटफॉर्म प्रख्यात रुग्णालये, विशेष डॉक्टर आणि मान्यताप्राप्त निदान प्रयोगशाळांसोबत सहयोग करतेय. ज्यामुळे त्याच्या वापरकर्त्यांसाठी विश्वासार्ह आणि व्यापक आरोग्य सेवेचा अनुभव मिळतो.

B2C मॉडेलसाठी एम फाईनचे मजबूत हेल्थकेअर नेटवर्क, संपूर्ण भारतातील 40 हून आधीक लॅब आणि 150 पेक्षा जास्त शहरांमध्ये 200 हूनआधीक अनुभव केंद्रांसह, तब्बल 8 लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. तर B2B मॉडेलमध्ये 2 हजार पेक्षा जास्त रुग्णालये, 10 हजार पेक्षा जास्त डॉक्टर आणि 5 हजाराहून आधिक पार्टनरस् सोबत जोडलेले आहोत. देशाच्या प्रत्येक भागात सर्वांना परवडतील आशा आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देतात. या पार्टनरशिपमुळे नाशिककरांना आता रेडिओलॉजी चाचण्यांसह 4500 हून जास्त प्रगत पॅथॉलॉजी चाचण्यांचा देखील लाभ घेता येणार आहे.