काही लागलं, खरचटलं तर आपण हळद लावतो किंवा घसा खराब असेल, सर्दी , खोकला झाला असेल किंवा नसा खेचल्या गेल्या असतील तर आपली आजी किंवा आई बऱ्याच वेळेस आपल्याला हळदीचे दूध (turmeric milk) पिण्याचा सल्ला देतात. हळदीच्या दुधाचे खूप फायदे (benefits) आहेत. हे एक सुपर ड्रिंक आहे. त्यामुळेच जगभरात सध्या हळदीच्या दुधाची अर्थात ‘ टर्मरिक मिल्क’ची मागणी वाढलेली दिसत आहे. हळदीच्या दुधामध्ये ॲंटी-बायोटिक, ॲंटी-इन्फ्लेमेटरी आणि ॲंटी- ऑक्सीडेंट गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे जगभरातील लोक हे दूध पिण्यास पसंती देतात. हे दूध प्यायल्याने शरीराला तसेच आपल्या त्वचेलाही (health and skin) खूप फायदे मिळतात. मेटाबॉलिज्म वाढते, त्वचा आतून सुंदर होते. भारतातही अनेक लोक हे दूध पितात. फिल्मस्टार्सही हे दूध पिण्यास पसंती देतात. अभिनेत्री करीना कपूर-खान हिची फिटनेस एक्स्पर्ट ऋजुता दिवेकर यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हळदीच्या दुधाचे फायदे विशद केले आहेत. या दुधाचे फायदे काय हे बऱ्याच जणांना माहीत असते, मात्र त्याचे सेवन नक्की कसे करावे, याचे ज्ञान अनेकांना नसते. जाणून घेऊया, हळदीचे दूध नक्की कसे प्यावे.
ऋजुता दिवेकर यांच्या सांगण्यानुसार, हळदीचे दूध पिण्यासाठी नेहमीच ब्रँड नसलेले, नेहमीच फुल-फॅट दूध वापरावे, जे तुमच्या आसपासच्या डेअरीमध्ये मिळू शकेल. ते शक्य नसेल तर गाईचे ताजे दूध घेण्यात प्रयत्न करा. फ्रीजबाहेर काही तास ठेवूनही खराब होत नाही, असे दूध चांगले असते, असे दिवेकर यांनी सांगितले.
हळदीचे दूध पिण्यासाठी वापरण्यात येणारी हळद ही प्राकृतिकरित्या उगवलेली असावी. ती अधिक चांगली असते.
रात्री हळदीचे दूध प्यायल्यामुळे तुम्हाला सर्दी किंवा खोकला व्हायची भीती वाटत असेल तर दुधामध्ये हळदीसह थोडेसे जायफळ किंवा काळी मिरी पावडर घालावी. हळदीच्या दुधामुळे संसर्गापासूनही बचाव होतो. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास वजन कमी होण्यासही मदत होते, कारण हळदीच्या दुधामध्ये ॲंटी-बायोटिक, ॲंटी-इन्फ्लेमेटरी आणि ॲंटी- ऑक्सीडेंट गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात.
पीसीओडीच्या रुग्णांसाठी हळदीचे दूध पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामध्ये तुम्ही थोडे अळीवही मिसळू शकता.