गरोदर महिलांना विज्ञानाचे वरदान, रक्त तपासणीतून उलगडेल आई-बाळाची स्थिती

| Updated on: Jan 10, 2022 | 2:33 PM

वैज्ञानिकांनी गरोदर महिलांसाठी एक नवीन रक्त तपासणी शोधली आहे. यामध्ये गरोदर महिला आणि तिच्या पोटातील बाळाच्या समस्या आणि आजाराची माहिती मिळेल. गरोदरपणातील प्रीक्लेम्पसियावर वेळीच उपचार होतील.

गरोदर महिलांना विज्ञानाचे वरदान, रक्त तपासणीतून उलगडेल आई-बाळाची स्थिती
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

गर्भधारणेची प्रक्रिया आजही विज्ञानासमोर आव्हान आहे. आजवर भ्रूणतील डीएनएवरून आजार किंवा इतर अडचणी समजून घेतले जायचे. मग आरएनएचे सँम्पल घेऊन अभ्यास व्हायचा. नुकत्याच शोधलेल्या रक्त तपासणीतून हा त्रास कमी होईल आणि गरोदरपणातील प्रीक्लेम्पसियावरही वेळीच उपचार होतील. काही स्त्रियांना गरोदरपणात प्रीक्लेम्पसियाचा त्रास होतो. ही एक गंभीर स्थिती असून यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्यास धोका असतो. त्यामुळे वेळीच उपचार आवश्यक आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘ नेचर ‘ जर्नलमध्ये हा संशोधन प्रसिद्ध झाले. गर्भधारणेनंतर आई आणि बाळाची प्रकृती उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे. पण कधी कधी Pre- Eclampsia नावाच्या आजाराचा सामना करावा लागतो. बहुतांश वेळी दुसऱ्यांंदा गर्भधारणेवेळी ही अडचण येते. पोटातील बाळावर याचा परिणाम होतो. गंभीर बाब म्हणजे जगातील 15 टक्के गरोदर महिलांना हा आजार होतो. त्यामुळे वैज्ञानिकांनी एक अशी रक्त तपासणी शोधून काढली की ती प्रीक्लेम्पसियाला वेळीच रोखण्यास मदत करेल. यामध्ये प्रीक्लेम्पसायासोबतच अन्य आजारांची माहिती मिळू शकते. विशेष म्हणजे या आजाराने संपूर्ण जगातच आई आणि बाळाचे मृत्यू होतात. कोव्हिड-19 च्या संक्रमणात हा धोका अजून वाढतो. यामुळे आई आणि बाळाला नुकसान पोचू शकते.

प्रीक्लेम्पसिया गरोदरपणात होतो. ती होण्याच्या लक्षणांमध्ये महिलेचे बीपी वाढतो. हात, पाय, चेहऱ्यावर सूज येते. लघवीतून प्रोटीन वाहून जातात. जर योग्य वेळी जर या आजाराचे निदान नाही झाले तर आई आणि बाळाच्या प्रकृतीवरचा धोका कायम राहतो. प्रीक्लेम्पसियाची लक्षणे 20 व्या आठवड्यानंतर दिसून येतात. वजन वाढणे, ब्लडप्रेशर वाढलेले असणे. ,जळजळ वाढणे, अस्वस्थता वाढणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, वेदना, श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. अशी लक्षणे दिसून आली तर तज्ञ डॉक्टरांना जरूर दाखवा. जेणेकरून वेळीच उपाय करता येईल.

करोना काळात जर प्रीक्लेम्पसिया आजाराने बाधित गरोदर महिला असेल तर तिने स्वतःची जास्त कळजी घ्यायला हवी. कारण करोनाचा सर्वाधिक परिणाम छातीवर होतो. त्यामुळे गरोदरपणात प्रीक्लेम्पसिया होण्याची शक्यता 60 टक्के अधिक वाढते. याशिवाय एचइएलएलपी सिंड्रोम, हीमोलिसिस म्हणजे रेड ब्लड सेल्सचे तुटणे, यकृताशी संबंधित गुंतागुंत वाढणे आणि प्लेटलेटस कमी होतात. त्यामुळे प्रीक्लेम्पसिया बाधित गरोदर महिलेने विशेष लक्ष द्यावे. उशीर होण्यापूर्वी डॉक्टरांना दाखवा. योग्य औषधोपचार आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाल आहार मिळाला तर शरीरात चांगल्या अँन्टीबॉडिज तयार होतात.

Hrithik Roshan Birthday Zodiac | बॉलीवूडचा हॉट स्टार हृतिक रोशनची रास तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या तुमच्या सुपर हिरोच्या राशीबद्दल सर्व काही

मतदार ओळखपत्राशिवाय मतदानाचा हक्क बजावू शकता! या 11 कागदपत्रांपैकी एकाची आवश्यकता 

आधार कार्डशी संबंधित व्यवहारांवर मर्यादा, Micro ATM आणि POS मशीन वर दिवसातून 5 वेळा काढता येणार रक्कम