Papaya Disadvantages : पपई खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. आरोग्यासाठी पपई चांगली मानली जातो. पण तुम्हाला माहित आहे की, कुठल्या समस्या असल्यावर पपईचे सेवन टाळले पाहिजे. पपई जरी पोषक तत्वांनी युक्त फळ असले तरी देखील काही लोकांनी त्याचे सेवन टाळले पाहिजे. पपईमध्ये जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पपई लठ्ठपणा कमी करण्यात मदत करते. पपईतून भरपूर फायबर मिळतात. मधुमेह, हृदय आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी पपई फायदेशीर मानली जाते. असे असले तरी आरोग्याच्या काही समस्यांमध्ये पपई सेवन त्रासदायक ठरु शकते.
ज्या व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास आहे अशा लोकांनी पपई खाऊ यनये. पपईत व्हिटॅमिन सी तर असतेच पण हे एक समृद्ध अँटिऑक्सिडेंट आहे. पण पपईचे जास्त सेवन स्टोनची समस्या उद्भवू शकते. पपई खाल्ल्याने कॅल्शियम ऑक्सलेटची स्थिती निर्माण होऊन स्टोनचा आकार वाढू शकतो.
पपई हृदयविकाराच्या आजारात चांगली असते. पण ज्यांचे हृदयाचे ठोके अनियमित आहेत त्यांनी पपई खाणे टाळले पाहिजे. पपईत सायनोजेनिक ग्लायकोसाइड आढळते जे अमीनो ऍसिडसारखे काम करते. यामुळे पचनसंस्थेत हायड्रोजन सायनाइड तयार होते आणि त्यामुळे हृदयाच्या ठोक्यांची समस्या वाढू शकते.
पपईमध्ये लेटेक्स असते. त्यामुळे गर्भवती महिलांनी अजिबात पपई खाऊ नये. पपई खाल्ल्याने गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते. यामुळे प्री-डिलीव्हरी होण्याचा धोका वाढतो. पपईमध्ये पपेन आढळते. अशा परिस्थितीत प्रसूती वेदना कृत्रिमरित्या सुरू होऊ शकतात.
पपईमध्ये चिटिनेज असते जे ऍलर्जीने ग्रस्त लोकांमध्ये समस्या निर्माण करू शकते. अशा लोकांनी पपई खाऊ नये. धीकधी यामुळे श्वास घेण्यात अडचण येऊ शकते. खोकला येऊ शकतो. तसेच डोळ्यांच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
ज्या लोकांच्या रक्तात साखरेची पातळी कमी आहे त्यांनी पपई खाऊ नये. हायपोग्लायसेमियाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी देखील पपईचे सेवन करु नये. पपईमुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी आणखी कमी होते. पपई खाल्ल्याने हृदयाचे ठोके जलद होतात किंवा कधी कधी शरीर थरथरू लागते.