लहान मुलांचे आरोग्य (health) आणि त्यांची शारीरिक उंची (height)याबद्दल सर्व पालकांना चिंता वाटत असते. मुलांची उंची एका ठराविक वयापर्यंतच वाढते, त्यामुळे सर्व पालक आपल्या मुलांना ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतात. उंची वाढवण्यासाठी व चांगले आरोग्य राखण्यासाठी मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनीही दररोज व्यायाम आणि योगासने (exercise and yogasana) केली पाहिजेत. उंची वाढवण्यासाठी ताडासन हे (Tadasana) सर्वात उत्तम आणि प्रभावी योगासन मानले जाते. हे आसन नियमितपणे केल्यास उंची तर वाढतेच, तसेच एकंदर आरोग्यावरही चांगला परिणाम दिसून येतो.
मुलाची उंची वाढवण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी दिवसातून किमान एक तास शारीरिक हालचाली, व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. मुलांना निरोगी ठेवण्यासाठी कोणती योगासने व व्यायाम करता येऊ शकतो, हे जाणून घेऊया.
मुलांनी ताडासन नियमितपणे केले पाहिजे. ताडासन केल्यामुळे उंची तर वाढतेच पण मुलांचे बॅलन्स साधण्याचे कौशल्यही विकसित होते. ताडासन करण्यासाठी सरळ, ताठ उभे रहावे. नंतर दोन्ही हात एकत्र वर उचलावे.
दोन्ही हातांची मूठ बांधा आणि नंतर एक पाय उचलून दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवत उभे रहा. काही काळ याच स्थितीत रहावे, नंतर दोन्ही हात व पाय खाली करावे. थोड्या वेळाने पुन्हा हीच क्रिया दुसऱ्या पायाने पुन्हा करा. दररोज ताडासन केल्याने उंची वाढण्यास मदत होते.
उंची वाढवण्यासाठी धावणे हा सर्वात महत्त्वाचा व्यायाम मानला जातो. केवळ मुलांनीच नव्हे तर मोठ्यांनीही दिवसातून थोडा वेळ धावले पाहिजे. मुलांची ऊर्जा चॅनेलाइज करण्यासाठी धावणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे, असे मत वेरीवेल फॅमिलीने व्यक्त केले आहे.
धावण्याचा हा व्यायाम मुलं कधीही करू शकतात. मुलांमध्ये धावण्याची आवड निर्माण व्हावी, त्यांना धावण्याची गोडी लागावी यासाठी मुलांच्या धावण्याच्या स्पर्धा आयोजित करता येतील. ज्यामुळे त्यांची प्रगती होण्यास मदतही होईल.
दोरीवरच्या/दोरीच्या उड्या मारणे ही एका प्रकारे ॲरोबिक ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामुळे बॅलन्स साधण्याची आणि को-ऑर्डिनेशनचे (समन्वय साधणे) कौशल्य विकसित होते.
दोरीच्या उड्या मारल्याने मुलांचा लठ्ठपणा कमी होतो तसेच त्यांचा आहारही वाढतो. दोरीवरच्या उड्या मारल्याने हृदयाची गती वाढण्यास मदत होते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.