नवी दिल्ली: गेल्या काही काळापासून हृदयाशी (heart) संबंधित आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. कमी वयातच हार्ट ॲटॅक (heart attack)आल्याने लोकांचा मृत्यू (death) होत आहे. हृदयरोगाच्या (heart disease) वाढत्या प्रकरणांबाबतही तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहे. मात्र असे असले तरी लोकांनी हृदयाशी संबंधित काही आजारांकडे लक्ष दिल्यास हार्ट ॲटॅकचा धोका कमी करता येऊ शकतो. शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल (cholesterol) हे हृदय रोग आणि हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमुख कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हृदयरोगाकडे लक्ष देऊन कोणकोणत्या समस्या टाळता येऊ शकतात, ते जाणून घेऊया.
दर तीन महिन्यांनी लिपिड प्रोफाईल टेस्ट केली पाहिजे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या पातळीची माहिती मिळते. तथापि, केवळ कोलेस्ट्रॉल नव्हे तर इतर समस्यांकडे लक्ष देणेही महत्वाचे आहे. लिपिड प्रोफाइल टेस्टमध्ये शरीरातील ट्रायग्लिसेराइड्सची पातळीही कळते , पण लोक त्याकडे लक्ष देत नाहीत.
उच्च ट्रायग्लिसेराइड्समुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जर शरीरात त्याची पातळी 200 पेक्षा जास्त असेल तर हार्ट डिसीज आणि हार्ट फेलही होऊ शकते.
राजीव गांधी रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. अजित कुमार यांच्या सांगण्यानुसार, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी , फॅटयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे आणि खराब लाईफस्टाईल यामुळे शरीरातील ट्रायग्लिसेराइड्सची पातळी वाढते.
बऱ्याच प्रकरणात हे अनुवांशिकही असू शकते. मात्र ट्रायग्लिसराइड्सची पातळी जास्त असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असे केल्याने हार्ट ॲटॅकचा धोका टाळता येऊ शकतो.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आजकाल हायपरटेन्शची (हाय बीपी) समस्याही लक्षणीयरित्या वाढत आहे. कमी वयातच लोक याला (आजाराला) बळी पडत आहेत. ही समस्या हृदयरोगाचे प्रमुख कारण बनू शकते.
अशावेळी आठवड्यातून किमान एकदा तरी बीपीची पातळी तपासणे गरजेचे आहे. जर (तुम्हाला) सतत उच्च रक्तदाब दर्शवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बीपीच्या समस्येची काळजी घेतली नाही, तर त्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.
शरीरात लठ्ठपणा वाढत असेल आणि मधुमेहाचाही त्रास होत असेल तर तेही हृदयरोगासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे लठ्ठपणा वाढत असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा. योग्य आहार घ्यावा, तसेच प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांचे प्रमाण वाढवावे.