नवी दिल्ली: आपल्या शरीराला कोणतीही दुखापत झाली तर आपण सगळे दोन प्रकारे बरे होतो. पहिले म्हणजे शारीरिकदृष्ट्या तर दुसरे म्हणजे मानसिकदृष्ट्या आपण बरे होतो. बऱ्याच वेळा असे पाहण्यात आले आहे की एखाद्या अपघातानंतर (accident) माणसं शारीरिकदृष्ट्या बरं होण्याकडे जास्त लक्ष देतात मात्र मानसिक आरोग्याकडे (mental health) त्यांचं पुरेस लक्ष नसतं. मात्र यामुळे खूप नुकसान होऊ शकतं. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अपघातानंतर, एखाद्या व्यक्तीला दुखापतीनंतरच्या तणावाची भावना किंवा पुन्हा अपघात होण्याची भीती वाटते. फिजिओथेरपी (Physiotherapy) ही एक वैद्यकीय थेरपी आहे जी पुनर्वसन, दुखापतीपासून बचाव, कायमस्वरूपी उपचार आणि संपूर्ण फिटनेस या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते.
या प्रकारची थेरेपी व्यक्तीला दुखापतीतून केवळ शारीरिकरित्या बरे होण्यास मदत करत नाही तर भावनिक आणि मानसिकरित्या बरे होण्यासही मदत करते. रुग्णांसाठी फिजिओथेरपी, ज्यामध्ये वेदना कमी करण्याची यंत्रणा, माहिती आणि चांगला सल्ला उपलब्ध असतो, त्यामुळे बरे होण्यास खूप मदत होते.
जिंदाल नेचरक्युअर इन्स्टिट्युटचे डेप्युटी चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. जी प्रकाश यांच्या सांगण्यानुसार, दुर्घटना झाल्यास किंवा दुखापत झाल्यास (त्या) व्यक्तीला मानसिक त्रासही होऊ शकतो. वेगवेगळ्या रूग्णांमध्ये दुखापतीचा प्रभाव वेगळा किंवा भिन्न असू शकतो. यामुळे, ते निराश होऊ शकतात किंवा रागावू शकतात.
– कोणतेही काम करण्यात मन न लागणे
– चिडचिड होणे
– राग येणे
– चिंता किंवा काळजी वाटणे
– डिप्रेशन अथवा नैराश्य येणे
– अपराध केला, अशी टोचणी लागणे
डॉ प्रकाश यांनी असे स्पष्ट केले आहे की, व्यायामाची गरज पूर्ण करण्यासाठी फिजिओथेरपी ही खूप उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकते. फिजिओथेरपी ही व्यायामावर आधारित असलेली थेरपी आहे जी लोकांना वेळोवेळी शारीरिक आणि मानसिकरित्या सक्रिय होण्यास मदत करते.
तसेच त्यांचे दैनंदिन जीवन पुन्हा सुरू करण्यास मदत करते. फिजीओथेरपीचा व्यक्तीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या थेरपीमुळे चिंता आणि डिप्रेशनची भावना कमी होते, त्यामुळे खूप फायदा होतो.
– मूड सुधारतो, चिंता व नैराश्याची भावना कमी होते, आत्मसंतुष्ट किंवा समाधान वाटू शकते. चिंता कमी होऊ शकते.
काही प्रसंगामध्ये फिजिओथेरपीद्वारे शस्त्रक्रिया करणे टाळता येऊ शकते, कारण कारण या थेरपीद्वारे जखमी टिश्यूज दुरुस्त केले जाऊ शकतात. केली जाऊ शकते. याशिवाय फिजिओथेरपीने औषधांचे सेवनही कमी करता येते.
फिजिओथेरपीचा सर्वात महत्त्वाचा पैलू असा आहे की त्यामुळे रुग्णांना हळू-हळू बरे वाटते व संपूर्णपणे बरे होण्याची आशा मिळते.