नवी दिल्ली: फ्री टाइम असो किंवा मूव्ही टाइम, पॉपकॉर्न (Popcorn) खायला सर्वांनाच आवडतं. कारण पॉपकॉर्नशिवाय या गोष्टी करायला मजाच येत नाही. मात्र पॉपकॉर्न खाण्याचे अनेक फायदे (benefits) आहेत, जे बऱ्याच जणांना माहीतही नसतील. पॉपकॉर्नमुळे अनेक फायदे मिळतात. त्यामध्ये अनेक पोषक तत्वं (nutrition) असतात. पॉपकॉर्न हे एका खास तऱ्हेच्या मक्याच्या दाण्यांपासून तयार केले जाते. हे मायक्रोव्हेवमध्येही बनवता येते. पॉपकॉर्नमध्ये फायबरसह पॉलिफेनिलिक कंपाऊंड, ॲंटी-ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन बी आणि मॅग्नेशिअम हे सर्व मुबलक प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर असते. एवढचं नव्हे तर पॉपकॉर्न खाल्याने वजन कमी (reduce weight) करण्यातही मदत मिळते, हे तुम्हाला माहीत आहे का ? त्याशिवायही पॉपकॉर्न खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.
वेब एमडीनुसार, एक हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून पॉपकॉर्न हा चांगला पर्याय ठरू शकतो. बरेच लोक त्यांच्या आवडीनुसार, पॉपकॉर्नवर मीठ, बटर किंवा इतर मसाल्यांचा टॉपिंग म्हणून वापर करता आणि पॉपकॉर्नचा आस्वाद घेतात. त्यामध्ये इतर स्नॅक्सपेक्षा जवळपास 5 पट कमी कॅलरीज असतात.
तसेच पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही, पोट भरलेले असल्यामुळे ती व्यक्ती पुन्हा पुन्हा (पदार्थ) खाणे टाळते. म्हणूनच पॉपकॉर्न वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यात चरबीचे (फॅट्स) प्रमाणही खूप कमी असते आणि पॉपकॉर्नचे नैसर्गिक तेल शरीरासाठी आवश्यकही असते.
– पॉपकॉर्न आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, तसेच यामुळे आपली पचनक्रियाही चांगली राहते.
– पॉपकॉर्नमध्ये ॲंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे डोळ्यांसाठी चांगले असतात, तसेच त्यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोळे सुजणे अशा समस्या देखील कमी होऊ शकतात.
– पॉपकॉर्नमध्ये व्हिटॅमिन बी, बी 3, बी 6 असते, ज्यामुळे शरीरात ऊर्जा कायम राहते.
– पॉपकॉर्न खाल्याने डिप्रेशन (नैराश्य्) कमी होण्यास मदत होऊ शकते.
– पॉपकॉर्न रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
पॉपकॉर्न बनवणं हे अगदी सोपं आहे. हवामान कसही असलं तरी पॉपकॉर्न प्रत्येक ऋतूत सर्वांच्याच आवडीचे असते. त्यामुळ केवळ वजन कमी होत नाही तर आरोग्यास इतरही फायदे होऊ शकतात.