हे घडलंय तो देश आहे पोर्तुगाल. 19 वर्षांची मुलगी. गरोदर राहिली. जुळी बाळं (Tweens) जन्मली. 8 महिन्यानंतर बाळांच्या बाबांनी डीएनए टेस्ट (DNA Test) करायचं ठरवलं. चाचणीच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्ट समोर आली. हा बाबा (Parents) तर फक्त एकाचाच बाप निघाला. दुसऱ्या बाळाचे पप्पा दुसरेच निघाले. वैज्ञानिक भाषेत याला हेट्रोपॅरेंटल सुपरफेक्यूंडेशन स्थिती म्हणतात. काय झालं नेमकं पाहुयात…
सर्वप्रथम हे लक्षात घ्या. ही अशी जगातली 20 वी केस आहे. आश्चर्य हे की दोन्ही बाळं अगदी सारखी दिसतात. त्यामुळे आईला वाटत होते, दोघांचेही बाबा एकच असतील. पण तसं नाहीये. दोघांचेही डीएनए वेगळे आहेत.
या विषयावर अभ्यास करणारे डॉ. टुलियो जॉर्ज म्हणतात, हेट्रोपॅरेंटल सुपरफेक्युंडेशनची ही स्थिती आहे. म्हणजेच आईच्या शरीरातील अंडी दोन वेगवेगळ्या पुरुषांद्वारे फर्टिलाइज होतात.
विशेष म्हणजे महिलेनंदेखील ही बाब मान्य केली. तिने दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवले होते.
दोन पुरुषांसोबत तिचे रिलेशन होते. म्हणूनच दोन मुलांमध्ये वेगवेगळे डीएनए आढळून आले.
तज्ज्ञ सांगतात, काही दिवसांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या पुरुषांचे स्पर्म महिलेच्या शरीरात गेल्यास, असे वेगळ्या प्रकारचे जुळे जन्मू शकतात. त्यांचे वडील आणि डीएनए वेगळे असू शकतात.
जगात अशा 20 केस आहेत, असं शास्त्रज्ञ म्हणतायत. पण डीएनए तपासणी होत नसल्याने सध्याची बातमी तुफ्फान चर्चेत आहे.
द गार्डियनच्या रिपोर्टमध्ये असोसिएशन ऑफ क्लिनिकल एम्ब्रायोलॉजिस्टच्या अध्यक्ष जॅसन यांनी ही स्थिती स्पष्ट केली आहे.
महिला एका वेळी दोन अंडी रिलीज करते. वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध आल्याने दोन अंडी फर्टिलाइज होतात. हीच हेट्रोपॅरेंटल सुपरफेक्युंडेशनची स्थिती ठरते.
सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आईची दोन अंडी वेगवेगळ्या पुरुषांच्या स्पर्मद्वारे फर्टिलाइज झाल्यास अशा प्रकारची दोन डीएनए असलेली जुळी जन्माला येतात.
आईच्या गर्भाशयातील बाळं वेगवेगळ्या गर्भनाळेशी जोडलेली असतात. दोघांमध्येही आईचा अंश एकसारखाच, पण वडिलांचा अंश वेगवेगळा.
ही सामान्य स्थिती नाही. अत्यंत दुर्मिळ घटना आहे. त्यामुळे जगभरातील वैज्ञानिकांसाठी हा अभ्यासाचा विषय ठरलाय.