मुंबई : प्रेग्नेंसीमध्ये (Pregnancy) महिलांमध्ये अनेक बदल होत असतात. महिला या दिवसात भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही गोष्टींसोबत डील करत असते. त्याचा शरीरात होणारे बदल हे तिलाच कळायला वेळ लागतो. या गरोदरपणात होणारे बदल्यांकडे तिला लक्ष देण्याची गरज असते. बाळाची काळजी घेताना तिला स्वत:चीही काळजी यावेळी घ्यायची असते. या काळात होणाऱ्या बदलाकडे महिलांने लक्ष देण्याची गरज आहे. काही महिलांना गर्भाशयात (Uterus) रक्ताच्या गाठी असल्याची तक्रार असते. गर्भाशयाच्या भिंतीपासून प्लेसेंटा वेगळे झाल्यावर रक्तस्त्राव होतो आणि रक्ताच्या गाठी तयार होतात. तुम्हाला या काळात रक्तस्त्राव होत असेल तर याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करुन घ्या.
प्रेग्नेंसी ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील खास क्षण असतो. जिथे आनंद असतो तिथे जरा थोडी भीती पण असते. आपल्या गर्भात एक जीव आपण वाढवत असतो त्याची जबाबदारी आपल्यावर असते मग अशावेळी आपली एक चूक त्या जीवावर येऊ शकते म्हणून सतत एक मनात भीती असते. आपल्या शरीरात रोज बदल होत असतात. अशात जर तुम्हाला गर्भाशयात रक्ताच्या गाठी जाणवल्या तर लगेचच डॉक्टरकडे जा. पण ही काय समस्या आहे आणि यावर काय उपचार असतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.
प्लेसेंटा गर्भाशयाच्या भिंतीपासून वेगळे झाल्यावर रक्ताच्या गाठी तयार होतात. जर एखाद्या अपघातात तुमच्या पोटाला मार बसला यातून तुमच्या पोटात रक्ताच्या गाठी होऊ शकतात.
हो, हाय बीपीचा त्रास असल्यास त्या महिलेला रक्तस्त्रावचा त्रास होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
गर्भाशयात रक्ताच्या गाठी झाल्या असतील तर महिलेला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. तसंच गर्भपात होण्याची शक्यता आहे. अशावेळी योनीतून खूप रक्तस्त्राव होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करुन घ्या.
डॉक्टर अशावेळी महिलेला आराम करण्याचा सल्ला देतात. तसंच डॉक्टर अल्ट्रालसाउंड करुन गर्भातील बाळाची प्रकृतीची माहिती घेतात. डॉक्टर महिलेला यावेळी मॉनिटर करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही करु नका आणि कुठल्याही गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष करु नका.
इतर बातम्या :