मुंबई : कोरोनानंतर लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. Corona होऊन गेल्यानंतर अनेकांनी वेगवेगळा आजार जडल्याचं सांगितलं आहे. 7 एप्रिल रोजी जगभरात जागतिक आरोग्य दिन ( World Health Day ) साजरा केला जातो. लोकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून काही संस्था काम करत असतात. पण वेगवेगळ्या व्हायरसमुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. कोरोनानंतर जगभरातील लोकांनी वाईट काळ पाहिला. कोरोना सध्या पुन्हा वाढतोय. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट पु्न्हा एकदा लोकांचं आयुष्य धोक्यात आणत आहेत.
कोरोनाने लोकांच्या मानसिक आरोग्यावर देखील मोठा परिणाम केला आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये कोणकोणत्या समस्या उद्भवत आहेत. त्यापासून तुम्ही कशी काळजी घ्याल याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
अनेक संशोधनांमध्ये कोरोना व्हायरसचे हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि शरीराच्या इतर भागांवर होणारे परिणाम नमूद करण्यात आले आहेत. कोरोना होऊन गेलेल्या लोकांना अजूनही वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मधुमेह, कर्करोग, हृदयविकार आणि किडनीचे आजार यासारखे जुने आजार जगभरातील लोकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहेत. पण कोरोनामुळे या आजारांचं प्रमाण ही वाढलं आहे.
कामाचा ताण, व्यायाम किंवा योगासनासाठी वेळ नाही आणि तणाव कमी करण्यासाठी आवश्यक अन्न न घेणे, धूम्रपान आणि मद्यपान तसेच चुकीची जीवनशैली यामुळे कोरोना सारख्या आजारांना पाय पसरवण्याची संधी मिळते. कोरोनामुळे केवळ फुफ्फुसांवरच नाही तर किडनी, हृदय आणि मेंदूलाही हानी पोहोचते. यामुळे अनेक मानसिक समस्या निर्माण होतात. हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, किडनीचे आजार हे कोरोनाचे दुष्परिणाम होऊ शकतात. कोणत्याही वयोगटातील लोकांना हे आजार होऊ शकतात. परंतु त्याचा सर्वाधिक परिणाम वृद्धांवर होतो.
1. मानसिक आजार
कोरोना नंतर चिंता, नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे आणि एकाग्रता भंग पावणे या समस्या सामान्य झाल्या आहेत, ज्यामुळे जीवनाचा दर्जा बिघडला आहे. ताणतणाव, एकटेपणा, कोरोनामध्ये जवळचे लोक गमावणे आणि आर्थिक संकटाने हे आजार वाढले आहेत.
2. कर्करोग
कोरोनामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. अलीकडील अभ्यासात वर्णन केले आहे की कोविड-19 विषाणू p53 (ट्यूमर तयार करण्यास प्रतिबंधित करणारे जनुक) आणि त्याच्याशी संबंधित मार्गांशी कसा संवाद साधतो, ज्यामुळे कर्करोगासारख्या रोगांची प्रगती रोखण्याची क्षमता कमकुवत होते.
3. श्वसन रोग
सतत खोकला, धाप लागणे, दीर्घकाळ छातीत जड वाटणे या समस्यांचे कारणही कोरोना आहे. अस्थमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) सारख्या पूर्व-अस्तित्वात असलेल्या श्वसन रोगांनी ग्रस्त लोकांसाठी ही परिस्थिती त्रासदायक ठरू शकते. Covid-19 चा प्रामुख्याने श्वसन प्रणालीवर परिणाम होतो आणि व्हायरसपासून बरे झालेल्या लोकांना दीर्घकाळ खोकला, श्वास लागणे आणि थकवा यासारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात. वायू प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने श्वसनाचे आजार होण्याचा धोकाही वाढू शकतो.
4. रक्तदाब
अनेक संशोधनातून समोर आले की लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या महामारीनंतर वाढली आहे. जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कोविड महामारीनंतर सर्व वयोगटातील लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचा आजार वेगाने वाढला आहे, जो चिंताजनक आहे.
5. हृदयरोग
“COVID-19 नंतर हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, हृदयाचे अनियमित ठोके, हृदयाची विफलता आणि रक्त गोठणे यासारख्या हृदयाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. असं डॉक्टरांचं मत आहे.
6. मधुमेह
कोविड-19 मधून वाचलेल्या अनेकांना मधुमेहासह अनेक आजारांचा धोका वाढला आहे. असं तज्ज्ञ सांगत आहेत.
7. दमा
रक्तप्रवाहासोबत ऑक्सिजनचा ताळमेळ राखणे कोरोनाने त्रस्त लोकांमध्ये अधिक आव्हानात्मक होते. जेव्हा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला विषाणूचा सामना करावा लागतो तेव्हा ही स्थिती बिघडते. ज्यामुळे वायुमार्गाच्या आसपासचे स्नायू आकुंचन पावू लागतात. या वेळी तयार होणाऱ्या श्लेष्मामुळे खोकला, छातीत दुखणे, घसा खवखवणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.
8. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी)
सामान्य लोकांपेक्षा कोरोना 19 मुळे COPD ग्रस्त लोकांना श्वासोच्छवास आणि फुफ्फुसाचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो. COPD मध्ये न्यूमोनिया होण्याचा धोकाही वाढतो.
अनेक आजार हे आपल्या जीवनशैलीशी आणि खाण्याच्या सवयींशीही संबंधित असतात. निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करून आपण हे आजार होण्याची शक्यता कमी करू शकता आणि चांगले जीवन जगू शकता.
निरोगी आहार हे हृदयविकार, टाइप 2 मधुमेह आणि अनेक आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतो आणि त्यांच्याशी लढण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो. संतुलित, निरोगी आहार म्हणजे शरीरावरील अतिरिक्त साखर, चरबी आणि सोडियमचे परिणाम कमी करण्यासाठी विविध फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ असलेला आहार.
नियमित शारीरिक हालचालींमुळे तुमच्या दीर्घकालीन आजारांशी लढा देण्याची ताकद वाढते. आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवा. यासोबत आठवड्यातून दोन दिवस स्नायू मजबूत करणारे व्यायाम करा.
अतिमद्यपानाच्या सवयीमुळे ब्लडप्रेशर, अनेक प्रकारचे कॅन्सर, हृदयविकार, पक्षाघात आणि यकृताचे आजारांना बळी पडू शकतात.
आजार टाळण्यासाठी आणि त्याचे लवकर निदान करण्यासाठी नियमितपणे डॉक्टरांकडे जा आणि तुमची तपासणी करा.
जर तुमच्या कुटुंबात कर्करोग, हृदयरोग, मधुमेह किंवा ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या आजारांचा इतिहास असेल, तर तुम्हाला तो आजार होण्याचा धोका अधिक असू शकतो. तुमचा कौटुंबिक इतिहास डॉक्टरांसोबत शेअर करा जो तुम्हाला या आजारांना लवकर प्रतिबंध किंवा निदान करण्यात मदत करेल.