हे बीज खाल्ल्याने दूर होते Depression, कचरा म्हणून डस्टबिनमध्ये फेकण्याची चूक करू नका!

| Updated on: Jul 08, 2023 | 11:51 AM

मानसिक आरोग्याला भारतात तितकेसे महत्त्व दिले जात नाही, पण निरोगी जीवनासाठी ते खूप महत्वाचे आहे. मन प्रसन्न असल्याशिवाय शरीर निरोगी ठेवता येत नाही. चला तर मग जाणून घेऊया तणाव टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता.

हे बीज खाल्ल्याने दूर होते Depression, कचरा म्हणून डस्टबिनमध्ये फेकण्याची चूक करू नका!
Pumpkin seeds
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: नैराश्य ही सध्याच्या काळातील एक मोठी समस्या बनली आहे. प्रेमात किंवा मैत्रीत फसवणूक, आर्थिक समस्या, नोकरीचा ताण, कौटुंबिक कलह किंवा कोणताही मोठा आजार अशा अनेक कारणांमुळे तणाव येऊ शकतो. मानसिक आरोग्याला भारतात तितकेसे महत्त्व दिले जात नाही, पण निरोगी जीवनासाठी ते खूप महत्वाचे आहे. मन प्रसन्न असल्याशिवाय शरीर निरोगी ठेवता येत नाही. चला तर मग जाणून घेऊया तणाव टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता.

भोपळ्याच्या बिया

  • नैराश्य कमी करण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया आहारात समाविष्ट करू शकता, त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे न्यूरोट्रांसमीटर नावाचे मेंदूचे रसायन तयार करते.
  • या केमिकलच्या माध्यमातून मूड सुधारता येतो. तसेच भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम देखील आढळते, जे मेंदूला शांती देते.
    याशिवाय या बियांमध्ये असलेले झिंक देखील तणाव दूर करू शकते.
  • भोपळ्याच्या बिया आपण अनेकदा निरुपयोगी समजून डस्टबीनमध्ये टाकतो, पण हे करताना ते आपल्याला किती उपयुक्त ठरू शकतात, हे लक्षात ठेवा.

भोपळ्याच्या बियांचे इतर फायदे

  1. ताणतणावाचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे झोपेचा त्रास. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश करू शकता. यामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळत असल्याने निद्रानाशापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.
  2. भोपळ्याच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि रक्तदाबही जास्त नसतो. अशा तऱ्हेने केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी मोठी समस्या बनलेल्या हृदयरोगांपासून तुम्ही सहज वाचू शकता.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)