मुंबई : थंडीच्या दिवसात भूक वाढते आणि शारीरिक मेहनत कमी होते. मात्र, हिवाळ्याच्या दिवसात काही छोट्या-छोट्या गोष्टींसह तुमच्या दिवसाची सुरुवात केल्यास हिवाळ्याचे दिवस तुम्हाला आरोग्यदायी आणि चैतन्य निर्माण करणारे ठरतील.
तुम्ही झोपेतून उठल्यानंतरही तुम्हाला अंथरुण सोडण्याची इच्छा होत नाही. आम्ही तुम्हाला अंथरुणातच शारीरिक हालचालीच्या कृती सुचविणार आहोत. तुमच्या शरीराला ताण द्या आणि पुन्हा सैल सोडा. चार ते पाच वेळा ही कृती करा. शरीरातील अंतर्गत तापमानात वाढ होईल. तुमच्यासाठी अधिक वेळ आल्यास उभे राहून जागेवर जॉगिंग करा. तुम्ही अंथरुण सोडण्यापूर्वी अशाप्रकारे क्रिया केल्यास तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
हिवाळ्याच्या दिवसाता साबणाचा वापर टाळावा. कोणत्याही उटण्याचा वापर करावा. पाय, हात, सांधे, मान यावर उटणे लावा. त्यानंतर सुयोग्यपणे स्नान करा आणि सुक्या टॉवेलने अंग व्यवस्थित स्वच्छ करा. तुम्हाला अंर्तबाह्य ताजेपणाची अनुभूती प्राप्त होईल.
थंडीच्या दिवसात अधिक भूक लागते आणि उपाशी पोटी थंडी देखील कडकडून वाजते. सकाळी भरपूर प्रमाणात पौष्टिक नाश्ता घ्या. आहारात अधिक उर्जा निर्माण करणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. प्रोटीन, पनीर, दूध, दाळी, ताजे फळ तसेच हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. थंडीच्या दिवसात गरम सूप सेवन करणे अत्यंत हितकारक ठरते.
वातावरणानुसार अनुरुप कपड्यांची निवड करा. थंडीच्या दिवसात गडद रंगाची कपडे वापरा. आतील कापडे कॉटनचे असल्याच सर्वोत्तम ठरेल. हातमोजे आणि पायमोजे घालण्याचे टाळू नका. तुम्हाला आराम मिळेल तसेच त्वचा देखील मुलायम राहील.
तुम्ही कार्यरत व्यक्ती असाल व कार्यालय तुमच्या घरापासून अधिक अंतरावर नसल्यास शक्य असल्यास पायी चालण्याचा प्रयत्न करा. तुमच्या शरीरातील रक्तवहनाची गती वाढेल आणि थंडीपासून बचाव करेल. हिवाळ्याच्या दिवसात लिफ्टचा वापर शक्यतो टाळावा. दिवसातून दोन ते तीन जिन्याच्या पायऱ्यांचा वापर करा. तुमच्या शरीराचा व्यायाम होईल तसेच उबदारपणाही मिळेल. तुम्हाला पायी चालणे शक्य नसल्यास घरातच जलदगतीने चालण्याचा प्रयत्न करा. पायी चालल्यामुळे शरीराला अधिक उर्जा प्राप्त होईल.
थंडीचा परिणाम ओठांवर थेट जाणवतो. थंडीपासून ओठांना वाचवा. पायाची मालिश करुन थंडीपासून बचाव करा. पायात सॉक्ससह स्लिपरचा वापर करा. ज्यामुळे पायांना भेगा पडण्याची शक्यता कमी होते. ओठांवर व्हॅसलिनचा वापर करा.