मुंबई : शरीरात (Body) यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढले की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. ज्याकडे दुर्लक्ष करणे कोणालाही कठीण होऊ शकते. वयाच्या 30 वर्षानंतर ही समस्या आपल्याला भेडसावू लागते. याचा परिणाम झाल्यास शरीरदुखी, सांधेदुखी, सूज किंवा सांधेदुखी यांसारख्या समस्या (Problem) उद्भवू शकतात. वास्तविक हे शरीरात उपस्थित असलेले एक रसायन आहे, जे प्युरीनयुक्त पदार्थांच्या पचनाच्या वेळी तयार होते. यामुळेच आपल्या शरीरातील यूरिक अॅसिडचे (Uric acid) प्रमाण नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्वाचे असते.
शरीरात वाढलेले युरिक अॅसिड कमी करण्यासाठी आपण मटार, दूध, पालक मशरूम, बिअर, राजमा यांचा आहारात कमी समावेश करावा. यामुळे आपली समस्या अधिक वाढू शकते. युरिक अॅसिड रक्तात विरघळते, बाकीचे मूत्रपिंडांद्वारे शरीराबाहेर जाते. युरिक अॅसिडची पातळी वाढली की समस्या निर्माण होऊ लागतात.
फळे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. शरीराला हायड्रेट देखील ठेवतात, परंतु लिंबूवर्गीय फळे देखील यूरिक अॅसिड वाढवू शकतात. या फळांमध्ये मोसमी आणि संत्र्याचा समावेश असतो, पण वजन कमी करण्यासाठी वापरल्या जाणार्या लिंबूमुळे पाय दुखणे, सांधेदुखी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी लोक लिंबाच्या पाण्याचे नेहमीच सेवन करतात.
काही लोकांना मिठाई इतकी आवडते की त्यांना सतत गोड खाण्याची इच्छा होते. जास्त साखर खाल्ल्याने आपले शरीर अनेक आजारांचे घर बनते, त्यापैकी एक म्हणजे यूरिक अॅसिडची समस्या. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गोड पदार्थांमध्ये असलेले फ्रुक्टोज यूरिक अॅसिडमध्ये वेगाने मिळू लागते आणि अशावेळी यूरिक अॅसिड वाढू लागते.
अल्कोहोलचे व्यसन शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढवू शकते. अल्कोहोलमध्ये भरपूर प्युरिन असते आणि त्याचे दररोज सेवन केल्याने शरीरातील यूरिक अॅसिड वाढते. लोकांना दारूचे व्यसन लागते आणि एकवेळ अनेक रोग त्यांच्या शरीरात होऊ लागतात. तुम्हाला दारूची सवय असेल तर आजपासूनच ती कमी करण्याचा प्रयत्न करा.