मुंबई : शरीर तंदुरुस्त आणि निरोगी (Healthy) ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम हा करावाच लागतो. नियमित व्यायाम केल्याने मन चांगले राहते, तसेच शरीराला लागणारे सर्व हार्मोन्स पण व्यवस्थित काम करतात. जर तुम्ही रोजच्या नियमानुसार 30 मिनिटे व्यायाम करू शकलात तर तुम्ही नैराश्यापासून (Depression) देखील दूर राहू शकता. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे नियमितपणे 30 मिनिटे व्यायाम करतात ते नेहमीच तंदुरुस्त राहतात. नैराश्य हा एक विकार आहे. जो अधिकाधिक लोकांना सध्याच्या जीवनशैलीमध्ये होताना दिसतो आहे. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी शारीरिक व्यायाम (Exercise) जास्त करण्याचा प्रयत्न करा. नियमांनुसार व्यायाम केल्याने शरीरातील सर्व हार्मोन्सना योग्य प्रकारे काम करतात आणि अनेक आरोग्य फायदे होतात.
व्यायाम करण्यासाठी सकाळची वेळ अधिक फायदेशीर ठरते. यामुळे आपण दररोज सकाळी किमान 30 मिनिटे नक्कीच चालले पाहिजे. यामुळे आपल्या शरीरामधील ऊर्जा वाढण्यास मदत होते. शिवाय व्यायाम झाल्यानंतर एक कप ग्रीन टी पिणे तर अधिकच फायदेशीर ठरते. सुरूवातीला हळूहळू चालले तरीही चालते. त्यानंतर फास्ट चालण्यास सुरूवात करा.
जर आपल्याला चालणे शक्य नसेल तर आपण दररोज सकाळी सायकल चालवायला नक्की हवी. सायकलिंग हा देखील खूप चांगला आणि फायदेशीर व्यायाम आहे. सायकलिंगमुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. विशेष म्हणजे सायकलिंग केल्याने अगदी कमी वेळेमध्ये शरीराचा चांगला व्यायाम होतो.
जर आपल्याला बाहेर जाण्यास वेळ मिळत नसेल किंवा बाहेर जाऊन व्यायाम करणे शक्य नसेल तर आपण घरच्या-घरी एक बेस्ट व्यायाम करू शकतो, तो म्हणजे दोरीवरच्या उड्या. कारण दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर वगैरे जाण्याची अजिबात गरज पडत नाही. अशावेळी आपण घरीच दोरीवरच्या उड्या मारून व्यायाम करायला हवा. किमान 50 दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न करा.
घरातील कामामुळे व्यायामासाठी वेळच मिळत नसेल तर आपण घरी दोन ते तीन गाण्यांवर डान्स केला पाहिजे. डान्स करणे देखील हा एक प्रकारचा व्यायामच आहे. मात्र, डान्स करतांना रूममधील फॅन बंद ठेवा. आपल्याला शक्य आहे तेवढा प्रयत्न करा. विशेष म्हणजे डान्स करताना शरीराच्या अवयवांचा व्यायाम नेमका कसा करायचा याचे व्हिडीओ तुम्ही इंटरनेटवर देखील पाहू शकता.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या)
संबंधित बातम्या :
Home Remedies : मेथी जास्त वेळ फ्रेश ठेवायचीय? करा ‘हे’ सोपे उपाय…