Cancer | वारंवार अन्न गरम करून खाणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, कॅन्सरचा धोका अधिक!

| Updated on: Jun 11, 2022 | 8:40 AM

बटाट्याची भाजीच नाहीतर बटाट्यापासून आपण अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करू शकतो. बटाटा खाणे देखील आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक आढळतात. बटाट्याचे पदार्थ परत परत गरम करून खाल्ल्याने स्ट्रिडियम बोट्युलिनम बॅक्टेरिया वाढू शकतात.

Cancer | वारंवार अन्न गरम करून खाणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, कॅन्सरचा धोका अधिक!
Image Credit source: genengnews.com
Follow us on

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना वारंवार स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो. मग काय एकदाच जास्त स्वयंपाक करून ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवून परत परत गरम करून दिवसभरशिवाय रात्रीही खायचा. सध्या आपली जीवनशैली (Lifestyle) इतकी जास्त बदलली आहे की, अनेकांकडे स्वयंपाक करण्यासाठीही वेळ नाहीये. मग अशावेळी अन्न परत गरम करून खाल्ले जाते. मात्र, ही सवय आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न परत गरम करून खाल्याने त्या पदार्थातील पोषक (Nutrients) तत्वे संपतात आणि त्यामध्ये हानिकारक घटक तयार होतात. ज्यामुळे कॅन्सर होण्याची देखील 100 टक्के शक्यता असते. याशिवाय अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात आणि अन्नातून विषबाधा (Poisoning) होण्याचा धोकाही वाढतो. विशेषत: प्रथिनांनी समृद्ध असलेल्या वस्तू वारंवार गरम करणे अधिक हानिकारक मानले जाते.

भात

आपल्या सर्वांनाच भात खायला प्रचंड आवडते. प्रत्येक घरामध्ये भात हा बनतोच. मात्र, शिल्लक राहिलेला भात गरम करून खाण्यावर अनेकांचा भर असतो. बऱ्याच वेळा शिल्लक राहिलेल्या खिचडीचे भजे तयार करून खाल्ले जातात. फूड स्टँडर्ड्स एजन्सीच्या म्हणण्यानुसार, भात पुन्हा गरम केल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. यामुळेच भात एकदाच तयार करा आणि खा. परत परत गरम करून खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते.

हे सुद्धा वाचा

हिरव्या भाज्या

हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, हिरवी भाजी परत परत गरम करून खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाहीये. कारण एकदा तयार केलेली भाजी परत गरम करून खाल्ल्याने त्यामधील पोषकतत्त्वे नष्ट होतात. तसेच त्यामध्ये हानिकारक घटकही तयार होतात. पालेभाज्यांमध्ये नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. ते पुन्हा गरम केल्यावर ते कार्सिनोजेनिक गुणधर्म सोडतात. यामुळे कर्करोग होण्याचा धोका अधिक होतो.

बटाटा

बटाट्याची भाजीच नाहीतर बटाट्यापासून आपण अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करू शकतो. बटाटा खाणे देखील आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक आढळतात. बटाट्याचे पदार्थ परत परत गरम करून खाल्ल्याने स्ट्रिडियम बोट्युलिनम बॅक्टेरिया वाढू शकतात. आपण बटाटे एक किंवा दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. मात्र, ते गरम करून अजिबात खाऊ नका.

नॉनव्हेज

आपल्याकडे नॉनव्हेज खायला अनेकांना आवडते. नॉनव्हेज खाणारे बरेच लोक ते सेव्ह करून फ्रीजमध्ये ठेवतात. मात्र, कधीही नॉनव्हेज गरमागरम खाणेच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. नॉनव्हेज पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यातील स्टेपल्सची प्रथिने खराब होण्याची शक्यता असते. फ्रीजमधून बाहेर काढणे आणि गरम करून नॉनव्हेज खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते, अन्नातून विषबाधा होऊ शकते.