दिवाळीपूर्वीच रुग्णालयात वाढू लागले श्वसनाच्या आजाराचे रुग्ण, असा करा स्वतःचा बचाव

| Updated on: Oct 21, 2022 | 4:55 PM

दिल्ली एनसीआरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) गंभीर श्रेणीवर आहे. वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना श्वसनाचे आजार होत आहेत. दमा आणि ब्राँकायटिसच्या अनेक केसेस पाहायला मिळत आहेत

दिवाळीपूर्वीच रुग्णालयात वाढू लागले श्वसनाच्या आजाराचे रुग्ण, असा करा स्वतःचा बचाव
Image Credit source: Narayana Health
Follow us on

राजधानी दिल्लीमध्ये दिवाळीपूर्वीच प्रदूषण वाढू लागले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, दिल्लीचा (Delhi) वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) आनंद विहारमध्ये 383 या आकड्यावर आहे, जो गंभीर श्रेणीत येतो. वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे अनेक प्रकारचे आजार होत आहेत, दिल्लीतल्या काही रुग्णालयात श्वसनास त्रास होत असलेले रुग्ण येऊ लागले आहेत. येत्या काही दिवसांत दिल्लीतील हवेची गुणवत्ता अजून खालावण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अनेक लोकांना अस्थमा आणि ब्रॉंकायटिसचा त्रास होत आहे. ॲलर्जी आणि रात्री झोपताना श्वास घेण्यास त्रास होणे, अशा समस्यांचाही सामना करावा लागत आहे. या ऋतूमध्ये अनेक प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरिया सक्रिय होतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यांमुळे वरच्या श्वसनमार्गात संसर्ग होतो, ज्यामुळे ॲलर्जी, दमा आणि ब्रॉंकायटिसचा त्रास होतो.

डॉ. अरुण शहा यांच्या सांगण्यानुसार, सध्या पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशमध्ये पेंढा जाळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यासोबतच वाहनांमुळेही वायू प्रदूषणात वाढ होते. ज्यामुळे AQI योग्य प्रमाणात रहात नाही. त्यामुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. हवेत असणारे छोटे-छोटे कण श्वासामार्फत फुप्फुसांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे अस्थमा, ब्रॉंकायटिस एवढंच नव्हे तर कॅन्सर होण्याचाही धोका असतो.

हे सुद्धा वाचा

डॉ. शहा यांच्या मते, लोकांना असं वाटतं की, फुफ्फुसाचा कॅन्सर हा फक्त धूम्रपान करणाऱ्यांना होतो, पण तसं नाही. कधीही धूम्रपान न केलेल्या लोकांनाही फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्याचे देखील दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे प्रदूषण.

ब्राँकायटिस व अस्थमाचे रुग्ण वाढत आहेत –
दिल्लीतील राजीव गांधी रुग्णालयाचे डॉ. अमित कुमार यांनी सांगितले की, या हंगामात ब्राँकायटिस आणि दम्याच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. रेस्पिरेटरी टॅक्टमध्ये इन्फेक्शन होऊन असे प्रकार घडतात. विशेष म्हणजे दिवाळीनंतर हा त्रास अधिक दिसून येत असला तरी वाढत्या प्रदूषणामुळेही असे प्रकार अजूनही पाहायला मिळत आहेत. लहान मुलांनाही दम्यासारख्या समस्या असतात. यामुळे त्यांना न्यूमोनिया देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना आधीच श्वसनाचे आजार आहेत त्यांनी स्वत: चे संरक्षण करणे महत्वाचे ठरते.

अस्थमाच्या रुग्णांनी अशी घ्यावी काळजी –

– सकाळी व संध्याकाळच्य वेळी गरम कपडे घालावेत.

– थंड हवेपासून बचाव करावा.

– घरातून बाहेर जाताना तोडांला मास्क लावावा.

– धूळ, धूर आणि प्रदूषण यांच्यापासून दूर रहावे.