हिवाळ्यात वाढतो न्यूमोनियाचा धोका, जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपचार

| Updated on: Nov 22, 2024 | 11:26 PM

हिवाळ्यात न्यूमोनियाची भीती सर्वाधिक असते. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांना न्यूमोनिया होण्याचा धोका जास्त असतो.

हिवाळ्यात वाढतो न्यूमोनियाचा धोका, जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपचार
pneumonia
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बरेच लोक हिवाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. पण हिवाळा हा आरोग्यासाठी अनेक आव्हाने घेऊन येतो. हिवाळ्यात सर्दी, तापा सोबतच श्वसनाचे आजार होण्याचा देखील धोका असतो. हिवाळ्यात न्यूमोनिया होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

न्यूमोनिया हा एक असा आजार आहे जो आपल्या फुफ्फुसांच्या संबंधित आहे. न्यूमोनिया मध्ये संसर्ग फुफुसांमध्ये पसरतो आणि एक किंवा दोन्ही फुफ्फुसांवर परिणाम करू शकतो.लहान मुले आणि वृद्ध देखील त्याचे बळी ठरू शकतात. न्यूमोनिया हा एक सामान्य आजार असला तरी त्याचा मृत्यू दर जास्त आहे. बॅक्टेरिया, विषाणू,बुरशी , एलर्जी इत्यादींमुळे न्यूमोनिया होऊ शकतो पण त्याची चिन्हे आणि लक्षणे सारखीच आहेत. हा एक सांसर्गिक रोग आहे. याचा अर्थ तो शिंकणे किंवा खोकल्यामुळे इतरांमध्ये पसरू शकतो.

न्यूमोनियाची लक्षणे

न्यूमोनियाची लक्षणे व्यक्तीचे वय त्याच्या आरोग्याची स्थिती आणि संसर्गाची तीव्रता यावर अवलंबून बदलू शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला न्यूमोनिया होतो तेव्हा त्याला ताप येतो, खूप थंडी वाजते, श्वास घेण्याचा त्रास होतो आणि छातीत दुखणे देखील कायम असते. त्यासोबतच खोकल्याबरोबर थुंकी मध्ये रक्त येण्याची शक्यता देखील असू शकते. हृदयाचे ठोके जलद होतात आणि व्यक्ती लवकर थकते तसेच अशक्तपणा येतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नखे आणि त्वचा निळी दिसायला लागते सुस्ती आणि चिडचिडही होऊ शकते ही न्यूमोनियाची सामान्य लक्षणे आहेत.

न्यूमोनियाची कारणे

फुफ्फुसात जळजळ आणि संसर्ग, ओलावा थंडी, संसर्गाचा प्रसार,कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती किंवा शरीराक पोषक तत्वांची कमतरता यामुळे न्यूमोनियाचा संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. शिंकणे आणि खोकल्याने त्याचे बॅक्टेरिया आणि विषाणू इतर लोकांमध्ये पसरू शकतात.

न्यूमोनियाचे उपचार

या आजारावर योग्यवेळी उपचार घेणे गरजेचे आहे नाहीतर हा आजार गंभीर स्वरूप घेऊ शकतो. त्यामुळे फुफ्फुसात गळू, हृदयाशी संबंधित आजार आणि जुनाट न्यूमोनिया होण्याची भीती असते. हिवाळ्यात न्यूमोनियाचा धोका वाढतो मात्र तो टाळण्यासाठी योग्य वेळी उपाययोजना करून वेळीच उपचार घेतल्यास त्याचे गांभीर्य टाळता येते. निरोगी जीवनशैली आणि लसीकरणाचा अवलंब करून हा गंभीर आजार टाळता येऊ शकतो.