Marathi News Health Say no to cigarette benefits Know What Happens In Your body After Quit Smoking know here full details by time to time
सिगारेट सोडल्यानंतर कसे वाटते ? शरीरात जाणवतात नेमके कोणते जाणवतात बदल?
सिगारेट सोडल्यानंतर दोन दिवसांनी वास घेण्याची क्षमता म्हणजेच आपल्याला वास व्यवस्थित येऊ लागतो. शरीरातील नसा नीट होऊन चव आणि वासाच्या संवेदना क्षमता योग्य कार्य करू लागतात
1 / 6
Quit Smoking: सिगारेट ओढणे शरीरासाठी हानिकारक (dangerous) असते यामुळे आपले फुफ्फुसे सहित संपूर्ण शरीर वर वाईट परिणाम होतो. सिगारेट ओढणाऱ्या लोकांना अनेकदा धूम्रपान करू नये(No smoking) असा सल्ला दिला जातो. धूम्रपान करणे जरी चुकीचे असले तरी ही सवय लवकर सुटत नाही. अनेकांना सिगारेट सुटण्याची लत जात नाही. सिगारेटची तलब लागण्यावर माणूस बैचेन होतो. अनेकदा अनेक लोक सिगारेट सोडण्याचे संकल्प करतात परंतु हा संकल्प काही दिवसावर तुटून जातो खूप कमी जण असे आहेत की इच्छा संकल्प करूनच सिगारेट सोडण्याची मनामधी इच्छा व्यक्त करत असतात.आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सिगारेट सोडल्यानंतर तुमच्या शरीरावर (human body) त्याचा नेमका काय परिणाम होत असतो आणि पुढील एक-दोन महिन्यात तुमच्या शरीरावर नेमके काय काय बदल जाणवू लागतात. सिगरेट सोडणे तुमच्या शरीरासाठी कशा प्रकारे लाभदायक ठरतील .
2 / 6
द टेलीग्राफ यांच्या रिपोर्टनुसार सिगारेट सोडल्यानंतर 8 घंटे झाल्यावर जेव्हा एखादी व्यक्ती अनेक वर्षापासून सिगारेट ओढत आहे आणि काही दिवसात तो जर सिगारेट बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा वेळी त्याच्या शरीरावर एकदमच धूम्रपान सोडल्याचा परिणाम जाणवू लागतो. जेव्हा आपल्याला सिगारेट सोडून आठ तास होतात तेव्हा आपल्या शरीरातील रक्त असते, तर रक्तामध्ये निकोटिन आणि कार्बन मोनॉक्साईड साईडची मात्रा कमी होऊन जाते. या कारणामुळे सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींना मांस पेशी आणि मस्तिष्कशी निगडित अनेक समस्या त्रास देऊ लागतात. 8 तासानंतर तुम्हाला सिगारेट ओढण्याची खूपच तीव्र इच्छा होईल आणि जर तुम्हाला अशा प्रकारची तलब लागली तर तुम्ही 5 ते 10 मिनिटं थांबून एखाद्या च्वुइंगम खाऊ शकता.
3 / 6
जेव्हा 12 तास होतील... जेव्हा सिगारेट सोडून 12 तास होतील तेव्हा तुमच्या शरीरातील कार्बन मोनॉक्साईड स्तर पुन्हा सर्वसामान्य परिस्थितीमध्ये येऊ लागेल अशावेळी सर्वात जास्त फायदा तुमच्या हृदयाला मिळतो. तुमच्या हृदयाला ऑक्सीजन घेण्याकरिता जास्त मेहनत करावी लागत नाही.
4 / 6
जेव्हा 24तास पूर्ण होतात तेव्हा जर तुम्ही अख्खा दिवस धूम्रपान न करता राहतात तेव्हा अशावेळी हृदयाचा झटका येण्याचा धोका तुम्हाला जास्त असू शकतो परंतु जर तुमचा अख्खा दिवस सिगारेट न ओढता गेला असेल तर तुम्ही सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या कॅटेगरीमध्ये हळूहळू येऊ शकतात.
5 / 6
जेव्हा 48 तास होतील सिगारेट सोडल्यानंतर दोन दिवसानंतर तुम्हाला वास घेण्याची संवेदना परत येऊ लागेल तसेच कोणत्याही पदार्थाचे वास ओळखण्याची क्षमता तुमच्या नाकामध्ये जाणवू लागेल तसेच तुमच्या शरीरातील नसा योग्य पद्धतीने कार्य करतील. तुमच्या शरीरात स्वच्छता करण्याचे कार्य सुरू होईल जसे की तुमचे फुफुसे योग्य गतीने कार्य करतील आणि फुफ्फुसांमध्ये जो कफ चालला असेल तो हळूहळू बाहेर पडू लागेल त्याचबरोबर तुमच्या शरीरातील निकोटीन सुद्धा हळूहळू कमी होऊ लागतो. यादरम्यान बैचेनी चक्कर येणे, उपाशी राहिल्या सारखे वाटणे, अशक्तपणा जाणवणे अशा समस्या तुम्हाला त्रास देऊ लागतील.अनेक लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये डोकेदुखी उद्भवते. त्यानंतर हळूहळू परिस्थिती सर्वसामान्य होते.
6 / 6
जेव्हा सिगारेट ओढून 2 आठवडे ते 3 महिने होऊन जातात अशा वेळी तुमचे फुफ्फुसे पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ आणि मजबूत बनतात.तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा आता चांगला झालेला असतो आणि म्हणूनच अशा वेळी जर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये एक्ससाइज केली तर तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव पूर्वीपेक्षा चांगल्या गतीने कार्य करतील सिगारेट सोडल्यानंतर 3 ते 6 महिन्यापर्यंत तुम्ही सहजरीत्या श्वास घेऊ शकतात त्याचबरोबर तुमच्या शरीरातील ऊर्जेमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे असे तुम्हाला हळूहळू जाणवेल. हिवाळ्याच्या दिवसात होणारे अनेक आजार पण तुमच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाहीत. त्याचबरोबर जर तुम्हाला सिगारेट सोडून 1 वर्ष होत असेल तर अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता खूपच कमी होते याचा अर्थ तुम्ही आता सर्वसामान्यपणे एका चांगल्या व्यक्तीचे जीवन जगण्यासाठी सक्षम होत आहात याचे हे संकेत आहे.