नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवलेला असतानाच तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यातही एक दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कधी वाढेल आणि ही लाट कधी ओसरेल याची डेडलाईनच तज्ज्ञांनी दिली आहे. (Second Covid wave peak expected by May 7: Experts)
दिल्लीतील मॅथेमॅटिकल मॉडिलिंग एक्सपर्ट प्रा. एम. विद्यासागर यांच्या मते कोरोनाची दुसरी लाट 7 मे रोजी पिकवर असेल. त्यामुळे आरोग्य सेवांनी सज्ज राहावं असं त्यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. 7 मे रोजी कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढलेला दिसेल. त्यानंतर या आठवड्याच्या अखेरपासून कोरोना संसर्ग ओसरताना दिसेल. कोरोनावर नियंत्रण आल्याचं दिसून येईल. मात्र, प्रत्येक राज्यात कोरोनाचा कहर वाढण्याची आणि कोरोनाची लाट ओसरण्याची परिस्थिती वेगवेगळी असेल, असं प्रा. विद्यासागर यांनी सांगितलं.
हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही सरासरी सात दिवस देतो. कारण रुग्णांची संख्या रोज कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आम्हाला रॉ नंबर्स पाहून चालणार नाही. तर दिवसाला किती रुग्ण सापडतात त्याची सरासरी पाहिली पाहिजे, असं सांगतानाच या आठवड्याच्या शेवटी कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसेल असा दावा विद्यासागर यांनी केला आहे.
प्रत्येक राज्यांची स्थिती वेगळी
वेगवेगळ्या राज्यात कोरोना पीकवर असेल. त्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्याही कमी होताना दिसेल. महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली दिसते. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रातून सुरू झाली. जे राज्य महाराष्ट्रापासून दूर आहेत. त्या राज्यात कोरोनाचा कहर वाढेल. त्यांचा डिक्लाईनही स्लो होईल. मात्र जे राज्य महाराष्ट्राच्या बाजूला आहेत. त्या राज्यात सर्वात लवकर कोरोनाचा संसर्ग शिगेला पोहोचेल आणि या राज्यातील धोकाही कमी होईल, असं सांगतानाच मे नंतर कोणत्याच राज्यात कोरोनाचा कहर वाढलेला दिसणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
रुग्णसंख्या शून्यावर येणार नाही
जास्तीत जास्त भारतात 10 ते 15 दिवस कोरोना संसर्ग शिगेला पोहोचलेला असेल. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरायला सुरुवात होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही, असंही त्यांनी सांगितलं. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची तुलना केल्यास पहिली लाट अत्यंत स्लो होती. पहिल्या लाटेचा कहर होण्यासाठी साडे तीन महिने लागले. त्यानंतर पहिली लाट धीम्या गतीनेच ओसरली होती. दुसऱ्या लाटेचा विचार करता 1 एप्रिल रोजी देशात 75 हजार रुग्ण होते. त्यानंतर एक महिन्यातच 4 लाख रुग्ण झाले. त्यामुळेच दुसरी लाट ज्या वेगाने पसरली, त्याच वेगाने ही लाट ओसरेल, अशी आशा आहे, असंही ते म्हणाले. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत भारतात दिवसाला 1.2 लाख रुग्ण सापडायला हवेत. याचा अर्थ असा नाही की कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
लाट ओसरण्यास वेळ जातोच
तर अशोका विद्यापीठाचे जीवशास्त्राचे प्राध्यापक गौतम मेनन यांच्या अंदाजानुसार कोरोनाची दुसरी लाट मेच्या दुसऱ्या आठवड्यात शिखरावर असेल. तर, कोरोनाची दुसरी लाट ज्या वेगाने आली होती, त्याच वेगाने ओसरेल या विद्यासागर यांच्या मताशी ब्राऊन यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डीन डॉ. आशिष झा यांनी असहमती दर्शवली आहे. कोरोनाचा संसर्ग ज्या वेगाने वाढतो त्या वेगाने कमी होताना दिसत नाही. लाट ओसरण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जातोच, असं झा यांनी सांगितलं. (Second Covid wave peak expected by May 7: Experts)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 5 May 2021 https://t.co/cwy9wZYYbc #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 5, 2021
संबंधित बातम्या:
हृदयविकाराच्या झटक्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू का होतोय?; वाचा लक्षणे आणि उपचार
CCTV | बीडमध्ये लसीकरण केंद्रावर DYSP ना धक्काबुक्की, पोलिसांचा नागरिकांवर लाठीचार्ज
(Second Covid wave peak expected by May 7: Experts)