धक्कादायक! सेक्स करताना लिंग फ्रॅक्चर, डॉक्टरांकडून ‘एगप्लान्ट डिफॉर्मिटी’चं निदान

| Updated on: Jul 08, 2022 | 12:49 PM

शरीरसंबंध ही सुख, समाधान देणारी गोष्ट आहे. पण इंडोनेशियात (Indonesia) एका 50 वर्षाच्या व्यक्तीसाठी हेच शरीरसंबंध एक प्रकारची शिक्षा ठरले आहेत.

धक्कादायक! सेक्स करताना लिंग फ्रॅक्चर, डॉक्टरांकडून एगप्लान्ट डिफॉर्मिटीचं निदान
Representative image
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबई: शरीरसंबंध ही सुख, समाधान देणारी गोष्ट आहे. पण इंडोनेशियात (Indonesia) एका 50 वर्षाच्या व्यक्तीसाठी हेच शरीरसंबंध एक प्रकारची शिक्षा ठरले आहेत. शरीरसंबंध ठेवताना या व्यक्तीच गुप्तांग फ्रॅक्चर झालं. शरीरसंबंधांच्यावेळी झालेल्या या प्रकारच्या फ्रॅक्चरला डॉक्टरांनी ‘एगप्लान्ट डिफॉर्मिटी’च निदान केलं आहे. हा पेनाइल फ्रॅक्चरचा प्रकार आहे. यामुळे सेक्स लाइफ मध्ये अनेक समस्या येतात. पेनाइल फ्रॅक्चर एक दुर्मिळ कंडीशन आहे. शरीरसंबंधांच्यावेळी पेनाइल फ्रॅक्चरमुळे (Penile Fracture) खूप त्रास होतो. शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा होत नाही. काही गंभीर प्रकरणात दुखापतीमुळे सूज (Swelling) येते. शरीरातील लघुशंका बाहेर सोडण्याचा मार्ग बंद होऊ शकतो. ‘एगप्लान्ट डिफॉर्मिटी’मुळे नपुसकत्व येऊ शकतं तसंच कायमस्वरुपी व्यंग सुद्धा निर्माण होऊ शकतं.

गुप्तांगामधून रक्त येत होतं

इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस रिपोर्ट मध्ये या रुग्णावर कसे उपचार केले. त्याच्याबरोबर नेमकं काय घडलं? त्याची सर्व माहिती प्रसिद्ध केली आहे. जोडीदारासोबत शरीरसंबंध ठेवताना या व्यक्तीच्या लिंगामध्ये फ्रॅक्चर झालं. फ्रॅक्चर झाल्याचं लक्षात येताच, तो लगेच जवळच्या रुग्णालयात गेला. त्याच्या गुप्तांगामधून रक्त येत होतं. ANI वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

शस्त्रक्रियेनंतर काय झालं?

डॉक्टरांना या रुग्णाच्या गुप्तांगाची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली. त्याच्या लिंगात कुत्रिम ताठरता निर्माण केली. शस्त्रक्रियेनंतर त्याला कुठलीही समस्या आलेली नाही. डॉक्टरांनी त्याला विश्रांतीसाठी पाच दिवस हॉस्पिटल मध्येच ठेवलं. हॉस्पिटलमधले पाच दिवस आणि त्यानंतरचे घरी असताना 21 दिवस, डॉक्टरांनी त्या व्यक्तीला नलिकेवाटे लघुशंका करण्यास सांगितलं होतं. कारण त्याच्या मूत्रमार्गामध्ये डॉक्टरांनी नलिका बसवली होती. शस्त्रक्रियेनंतर चार महिन्यांनी त्या व्यक्तीने आपलं कामजीवन पूर्वीसारखं व्यवस्थित झाल्याचं डॉक्टरांना सांगितलं.