मुंबई : कोरोनाच्या काळात मुलांना सुरक्षीत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण अद्याप 12 वर्षांखालील मुलांचे लसीकरण झालेले नाही. मुलांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी पालक मुलांची रोग प्रतिकारशक्ती (Immunity) कशी वाढेल याकडे लक्ष देतात. यातून अनेकवेळा पालक हे आपल्या मुलांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिनचे सप्लीमेंट(supplements) देतात. मात्र खरोखरच सप्लीमेंटमुळे इम्यूनिटी वाढते का? अशा पद्धतीने मुलांना सप्लीमेंट देण्याचे काय फायदे अथवा तोटे असू शकतात? हे जाणून घेणे म्हतत्त्वाचे असते. मुलांना खरच सप्लीमेंटची गरज असेल तरच त्यांना सप्लीमेंट देण्यात यावी. तसेच मुलांना सप्लीमेंट देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा असे तज्ज्ञांचे मत आहे. ज्या गोळ्यांमधून किंवा पावडरमधून कॅल्शियम, लोह, सर्वप्रकारचे व्हिटॅमिन (vitamins) अधिक प्रमाणात मिळतात त्याला साधारणपणे सप्लीमेंट असे म्हटले जाते.
कोकिलाबेन हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ भक्ती सामंत या याबाबत माहिती देताना म्हणतात की, मुलांच्या शरीराचा विकास होण्यासाठी त्यांना जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमची गरज असते. जर मुले नीट खात असतील तर त्यांना अन्नातूनच कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मिळतात, परंतु काही कारणास्तव काही गोष्टी मुलांना दिल्या जात नसतील तर 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना सप्लीमेंट द्यायला हरकत नाही. अनेक मुलांना घरचे जेवन आवडत नाही. त्यांना जंक फूड खायला आवडते. अशा स्थितीमध्ये त्यांचे पालन पोषण निट होत नाही. अशा मुलांना सप्लीमेंटची आवश्यकता असते.
याबाबत बोलताना भक्ती सामंत म्हणतात की, सप्लिमेंट्स शरीराच्या विकासात मदत करत असली तरी देखील ती फक्त डॉक्टरांच्या देखरेखीखालीच मुलांना देण्यात यावी. डॉ. भक्ती सामंत यांच्या मते, अनेक मुले शाकाहारी अन्न खातात. शाकाहारी आहारात बी-12, ओमेगा -3, जस्त, लोह, व्हिटॅमिन डी-3 आणि इतर पोषक तत्वांचा अभाव असतो. तसेच अनेक मुलांना दूध प्यायला आवडत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीखाली आपण शाकाहारी मुलांना काही प्रमाणात सप्लीमेंट देऊ शकतो.
डॉ. भक्ती सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात एनर्जी ड्रिंक्स आणि एनर्जी बारसारखे अनेक पर्याय सर्व वयोगटातील लोकांसाठी, विशेषतः लहान मुलांसाठी आहेत. ऊर्जा आणि ताकद वाढवण्याच्या नावाखाली ते विकले जातात, परंतु ते पिल्याने मुलांचे आरोग्य बिघडू शकते. मुलांना लठ्ठपणा, मधुमेह असे अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टी मुलांना देऊ नका. जर तुम्हाला द्यायचेच असेल तर तुम्ही घरच्या घरी बनवलेले एनर्जी ड्रिंक्स मुलांना देऊ शकता.
(टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.)
रोज सकाळी एक कप धन्याचे पाणी प्या; ‘या’ आजारांपासून दूर रहा
Covid-19: बापरे! संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना कोरोनाची लागण
ही दुखणं सांगतात तुम्हाला थंडी बाधली…त्यामुळे घ्या काळजी कारण मुंबईत अचानक थंडी वाढली…