नवी दिल्ली: अभिनेत्री आलिया भट्ट ही लवकरच आई होणार असून तिच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात शाकाहारी मेन्यू ठेवण्यात येणार आहे. कारण 2020 आलिया शाकाहारी (Vegan)बनली होती. आलिया सध्या गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये जागतिक स्तरावर शाकाहार स्वीकारणाऱ्या आणि शाकाहारी भोजन करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत झालेल्या अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की शाकाहारी भोजनाच्या मदतीने हृदय विकार, कॅन्सर आणि टाइप 2- मधुमेह (diabetes) यांसारख्या आजाराचा धोका कमी होऊ शकतो. पण आता प्रश्न असा निर्माण होतो की गरोदरपणात (pregnancy) शाकाहारी पदार्थ खाणं बाळाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे का?
दिल्लीचे आहारज्ज्ञ डॉ. निशांत तन्वर यांनी TV9 शी बोलताना सांगितले की शाकाहारी भोजन करणाऱ्या गर्भवती महिलेला व्हिटॅमिन बी 12, कॅल्शिअम, आयोडीन, लोह तसेच प्रथिने इत्यादींच्या गंभीर कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. यामुळे जन्मत:च बाळाचं वजनही कमी होऊ शकतं. “गरोदरपणात लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी लोह हे सर्वात महत्वाचे पोषक तत्व ठरते. त्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊ शकतो. त्याचप्रमाणे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी व्हिटॅमिन बी 12 खूप महत्त्वाचं असतं ” असंही डॉ. तन्वर यांनी समजावले.
ज्या व्यक्तींना कॅलरीजचे प्रमाण कमी करायचे आहे आणि हृदयरोगाचा धोका कमी करायचा आहे त्यांच्यासाठी शाकाहारी जेवण हा एक चांगला पर्याय असू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, गरोदर महिलांसाठी (केवळ) शाकाहारी भोजन घेणे योग्य नाही. कारण गर्भावस्थेत बाळाची चांगली व निरोगी वाढ व्हावी यासाठी प्रथिने खूप महत्वाची असतात.
अंडी, चिकन, मासे, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. जर एखादी महिला शाकाहारी असेल तर तिला या प्रथिनांसाठी सप्लीमेंट्सची आवश्यकता असेल. डॉ. तन्वर यांच्या मते, ” जे अन्न नैसर्गिकरीत्या शरीराला जीवनसत्वं आणि पोषक तत्वं देतं, ते पदार्थ खाणं कधीही चांगलं असतं. त्यासाठी औषधे खाण्याची गरज पडू नये, असेही डॉक्टरांनी नमूद केले.
दिल्लीतील पीतमपुरा येथील मदर्स लॅफ आयव्हीएफ सेंटरमधील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि इनफर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. शोभा गुप्ता सांगतात की, बहुतांश भारतीयांच्या मते शाकाहारी असणे म्हणजे शाकाहारी पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे होय. ते फक्त एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, ते मांसाशी संबंधित उत्पादने असतात, असे त्यांनी सांगितले.
द हेल्थलाइन नुसार, व्हेगनिजम (शाकाहार) हे जीवन जगण्याची एक अशी पद्धत आहे, ज्यामध्ये कोणत्याही पशूचे /प्राण्याचे शोषण केले जात नाही अथवा त्यांच्याशी क्रूरपणे वागले जात नाही. अन्न, कपडे किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी ही वागणूक दिली जात नाही.
डॉ. शोभा यांच्या मते, “कुक्कुटपालनावर आधारित उत्पादनं पचायला वेळ लागतो, असं सर्वसाधारण मत आहे. यामुळे गर्भवती महिलांना प्लांट-बेस्ड (वनस्पती-आधारित) आहार घेणं आवडतं. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की, गरोदर महिलांनी आपल्या डॉक्टरांशी आणि आहारतज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करावी आणि मुलाच्या योग्य विकासासाठी त्यांनी सांगितलेले अन्न खावे, असेही डॉ. शोभा यांनी स्पष्टपणे नमूद केले.
डॉ. शोभा गुप्ता यांनी डॉ. तन्वर यांच्या बोलण्याशी सहमती दर्शवली. त्या म्हणाल्या की, हाडांच्या आरोग्यासाठी दुग्धजन्य पदार्थ खूप महत्वाचे आहेत. त्या पदार्थांमध्ये या गोष्टींमध्ये जैवउपलब्धता (Bioavailability) खूप जास्त असते. पण त्यासाठी सोया मिल्कसारखे पर्यायही उपलब्ध आहेत. गर्भवती महिला या कीनुआ, दलिया, बाजरी, बदाम आणि डाळी खाऊ शकतात, असे डॉ. तन्वर यांनी स्पष्ट केले.