Side Effects of Amla : ‘या’ लोकांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय आवळा खाऊ नये, वाचा याबद्दल सविस्तर! 

| Updated on: Nov 12, 2021 | 3:50 PM

आवळा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानला जातो. आयुर्वेदात हे वरदान मानले जाते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, पॉलिफेनॉल, लोह, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि जस्त यांसारखे पोषक घटक आढळतात. हे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, तसेच त्वचा, डोळे आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

Side Effects of Amla : या लोकांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय आवळा खाऊ नये, वाचा याबद्दल सविस्तर! 
आवळा
Follow us on

मुंबई : आवळा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानला जातो. आयुर्वेदात हे वरदान मानले जाते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, पॉलिफेनॉल, लोह, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि जस्त यांसारखे पोषक घटक आढळतात. हे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, तसेच त्वचा, डोळे आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

यकृत रोग

यकृताच्या रुग्णांनी आवळ्याचे सेवन मर्यादित प्रमाणात आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच करावे. आवळ्याचे सेवन पूर्णपणे टाळावे. जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्याने यकृतातील एन्झाईम्सची पातळी वाढू शकते, जे यकृताच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे.

कमी रक्तदाब

ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी आवळ्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. ते खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो. अशा परिस्थितीत रुग्णाची समस्या वाढू शकते.

कमी साखर

ज्या लोकांमध्ये साखरेचे प्रमाण कमी आहे. त्यांच्यासाठी आवळा जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक ठरू शकते. आवळा खाल्ल्याने साखरेची पातळी कमी होते, त्यामुळे हायपोग्लाइसेमियाचा धोका वाढू शकतो.

किडनी रुग्ण

ज्या लोकांना किडनीशी संबंधित कोणतीही समस्या आहे. त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे सेवन करावे. आवळ्याच्या अतिसेवनाने शरीरातील सोडियमची पातळी वाढते, तसेच किडनीच्या कार्यावरही परिणाम होतो.

सर्दी आणि खोकला

जर तुम्हाला सर्दी आणि फ्लूची समस्या असेल तर तुम्ही या दरम्यान आवळा खाणे टाळावे. आवळा थंड आहे, अशा परिस्थितीत तो तुमची समस्या आणखी वाढवू शकतो. याशिवाय आवळ्याचे जास्त सेवन केल्यानेही अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

त्वचा आणि टाळू

जर तुम्हाला त्वचा आणि टाळूच्या कोरडेपणाची समस्या असेल तर आवळ्याचे जास्त सेवन केल्याने ही समस्या वाढू शकते. याशिवाय आवळ्यामध्ये असे काही घटक असतात, ज्यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आवळा खाल्ल्यानंतर भरपूर पाणी प्या.

संबंधित बातम्या : 

Weight Loss |  ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…