Side Effects of Coconut Water: प्रत्येकासाठी फायदेशीर नसते नारळपाणी, ‘या’ लोकांना होऊ शकतो त्रास

| Updated on: Sep 29, 2022 | 4:18 PM

नारळ पाण्याचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर कमी होऊ शकते. ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर नारळ पाणी प्यावे.

Side Effects of Coconut Water: प्रत्येकासाठी फायदेशीर नसते नारळपाणी, या लोकांना होऊ शकतो त्रास
प्रत्येकासाठी फायदेशीर नसते नारळपाणी, 'या' लोकांना होऊ शकतो त्रास
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: सुपर फूड कॅटॅगरीत असलेले नारळाचे अथवा शहाळ्याचे पाणी (Coconut Water) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (beneficial for health) असते. मात्र काही लोक असे असतात ज्यांना नारळाचे पाणी प्यायल्याने त्रास होऊ शकतो. नारळ पाण्यामध्ये पोटॅशिअम (potassium), सोडिअम आणि मॅग्नेशिअम सारखे कार्बोहायड्रेट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीर हायड्रेट करण्यासाठी व इलेक्ट्रोलाइट संरचना उत्तम बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. मात्र असे असले तरी नारळ पाणी सर्वांसाठीच फायदेशीर ठरते असे नाही, असे मत काही तज्ज्ञांनी नोंदवले आहे. वेबएमडीनुसार, ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरचा (blood pressure) त्रास आहे किंवा पोटॅशिअमची समस्या आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच नारळ पाणी प्यावे.

नारळ पाणी प्यायल्याने कोणत्या व्यक्तींना होऊ शकतो त्रास?

इलेक्ट्रोलाइट असंतुलन

ज्या लोकांना पोटॅशिअमची समस्या जास्त आहे, त्यांच्या शरीरात नारळपाणी पिण्यामुळे इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते. खरंतर, नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण इलेक्ट्रोलाइट्सपेक्षा जास्त असते, म्हणून जर त्याचे जास्त सेवन केले तर पोटॅशिअमची पातळी वेगाने वाढू शकते. आणि अर्धांगवायूचा (पॅरॅलिसिस) धोका वाढू शकतो.

ब्लड प्रेशर कमी होऊ शकते

नारळाच्या पाण्याच्या सेवनाने रक्तदाब कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत ज्या लोकांना लो ब्लडप्रेशरचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच नारळाच्या पाण्याचे सेवन करावे.

हे सुद्धा वाचा

वजन वाढते

नारळाच्या पाण्यात जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे नारळाच्या पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील कॅलरीज वाढतील आणि तुमचे वजनही वाढेल.

सिस्टिक फायब्रोसिस

सिस्टिक फायब्रोसिस ही एक अनुवांशिक समस्या असते, ज्यामध्ये शरीरातील मीठाची पातळी कमी होते. नारळाच्या पाण्यात सोडिअम खूप कमी आणि पोटॅशिअम खूप जास्त असते. अशावेळी सिस्टिक फायब्रोसिस झाला असेल तर मिठाची पातळी वाढवण्यासाठी नारळाचे पाणी पिऊ नये.

किडनीचा आजार

नारळ पाण्यात पोटॅशिअम खूप जास्त असते, ज्याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आधीच किडनीचा काही त्रास अथवा आजार असेल तर आपल्या डॉक्टरांना सांगूनच किंवा त्यांच्या सल्ल्यानेच नारळाच्या पाण्याचे सेवन करा.

शस्त्रक्रिया

जर तुमची एखादी शस्त्रक्रिया (surgery)झाली असेल किंवा शस्त्रक्रिया होणार असेल तर त्याआधी किंवा नंतर रक्तदाब संतुलित असणे महत्वाचे आहे. नारळाचे पाणी प्यायल्याने आपला रक्तदाब कमी करू होऊ शकते. त्यामुळे शस्त्रक्रिया होण्याच्या किंवा झाल्यानंतरच्या काळात नारळाच्या पाण्याचे सेवन करू नका.