Honey Side Effects | मधाच्या अति सेवनामुळे होणारे नुकसान!

| Updated on: Aug 12, 2023 | 11:43 AM

रोजच्या आहारात मधाचे जास्त सेवन केल्यास तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. कारण मधात साखर आणि कार्बचे प्रमाण पुरेसे असते. ज्यामुळे शरीरात कॅलरीज झपाट्याने वाढू लागतात. सकाळ-संध्याकाळ चहा आणि गोड पदार्थांमध्ये मध मिसळून सेवन केल्यास वजन वाढू शकते. त्यामुळे मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन करावे.

Honey Side Effects | मधाच्या अति सेवनामुळे होणारे नुकसान!
honey side effects
Follow us on

मुंबई: मध हे अनेक गुणधर्म आणि पोषक तत्वांचे भांडार आहे. शरीरातील अनेक आजार दूर करण्यासाठी मध अतिशय उपयुक्त आहे. मध अमृतापेक्षा कमी मानला जात नाही. हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे धोकादायक आजारांना आपल्यापासून दूर ठेवते. मधाचा वापर बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी करतात. कारण साखर खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. अशावेळी आहारात मधाचा समावेश केल्यास वजन झपाट्याने कमी होऊ शकते, असा सल्लाही आरोग्य तज्ञ देतात. इतके फायदे असून सुद्धा मधाचे अतिसेवन आरोग्याला हानी पोहोचवू शकते यावर तुमचा विश्वास बसणार का? पण हे खरं आहे. चला जाणून घेऊया आहारात अधिक मधाचा समावेश केल्याने आरोग्याचे कोणते नुकसान होऊ शकते…

जास्त मधाचे सेवन करणे टाळा

रोजच्या आहारात मधाचे जास्त सेवन केल्यास तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. कारण मधात साखर आणि कार्बचे प्रमाण पुरेसे असते. ज्यामुळे शरीरात कॅलरीज झपाट्याने वाढू लागतात. सकाळ-संध्याकाळ चहा आणि गोड पदार्थांमध्ये मध मिसळून सेवन केल्यास वजन वाढू शकते. त्यामुळे मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन करावे.

मध खूप गरम असतो. जे लोक साखरेऐवजी प्रत्येक खाद्यपदार्थात मध वापरतात त्यांच्या पचनास गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते. तसेच पोटात दुखू शकते.

मधाचे जास्त सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी ही झपाट्याने वाढते. यामुळे तुम्हाला मधुमेहाचा धोका संभवतो. त्यामुळे प्रत्येक खाण्यापिण्यात मधाचा वापर करू नये.

मधाच्या अतिसेवनामुळे तुमच्यात हायपरटेन्शनची समस्या ही उद्भवू शकते. त्याचबरोबर तुम्हाला ॲलर्जीची समस्याही होऊ शकते. मधात असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित करण्याचे काम करतात. पण याच्या अतिसेवनाने तुम्ही उलट्या आणि अतिसाराचे शिकार होऊ शकता.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)