भारतात अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचीही मदत घेतली जाते. आयुर्वेद ही जगातील सर्वात जुनी उपचार पद्धती (Ancient healing methods) आहे. आयुर्वेदामध्ये विविध प्रकारचे रोग आणि आरोग्यविषयक स्थिती बरे करण्याची क्षमता आहे. त्याच्या उपचारासाठी विविध नैसर्गिक औषधी वनस्पती, फळे आणि इतर घटक वापरले जातात. परंतु, काही आयुर्वेदिक औषधी शरीरासाठी घातकही ठरू शकतात. त्यामुळे, डॉक्टरांना विचारल्याशिवाय अशा औषधीचे सेवन न करणेच योग्य ठरते. आयुर्वेदात अशी अनेक औषधे आहेत, जी तुमच्या आरोग्याला फायदेशीर ठरतात. यांपैकी एक म्हणजे त्रिफळा. त्रिफळा ही अशीच एक हर्बल पावडर (A herbal powder) आहे, जी तीन वेगवेगळ्या प्रकारची फळे वापरून बनवली जाते. त्रिफळा पावडर (Triphala powder) अमलकी, बिभिटकी आणि हरितकीपासून बनवली जाते. या पावडरचे अनेक आरोग्य फायदे आहेत. तुम्हाला याची अनेक सप्लिमेंट्स आणि टॅब्लेटही बाजारात मिळतील. पण ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन केल्याने हानी होते, त्याचप्रमाणे त्रिफळा जास्त प्रमाणात सेवन करू नये.
तज्ज्ञाच्या मते, त्रिफळामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत. जे रुग्ण आधीच मधुमेहाची औषधे घेत आहेत, त्यांच्यामध्ये त्रिफळा खाल्ल्याने हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. ज्यामुळे रक्तातील साखर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर त्रिफळा चूर्ण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.