ऑफिसमध्ये रोज इतके तास बसणे ठरू शकते धोकादायक! लवकरच येईल…

| Updated on: Nov 23, 2024 | 9:00 AM

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की जर तुम्ही दररोज साडेआठ तासांपेक्षा जास्त वेळ सतत बसत असाल तर याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जे लोक दिवसातील साडे आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसतात आणि शारीरिक हालचालींसाठी कमी वेळ घालवतात त्यांचे कॉलेस्ट्रॉल आणि BMI चांगले राहत नाही.

ऑफिसमध्ये रोज इतके तास बसणे ठरू शकते धोकादायक! लवकरच येईल...
office sitting
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

एका जागेवरच बसून काम करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की जर तुम्ही दररोज साडेआठ तासांपेक्षा जास्त वेळ सतत बसत असाल तर याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. घरात, ऑफिसमध्ये किंवा प्रवास करताना सतत बसून राहणे हे शारीरिकदृष्ट्या हानिकारक तर आहेच पण यामुळे अकाली वृद्धत्वही येऊ शकते.

जास्त वेळ बसल्याने हृदयाच्या समस्या आणि चयापचय रोगांचा धोका देखील वाढू शकतो. या संशोधनात सहभागी असलेल्यांनी दररोज सरासरी नऊ तास बसण्याचा विक्रम केला त्यानंतर त्यांना शारीरिक हालचालींसाठी फक्त 80 ते 160 मिनिटे वेळ मिळाला व्यायाम करून बसण्याचे वाईट परिणाम काही प्रमाणात कमी करता येतात असे या संशोधनातून समोर आले आहे. दिवसातून वीस मिनिटे चालणे किंवा शारीरिक हालचाल केली तरी देखील बसण्यामुळे झालेले नुकसान ते कमी करू शकत नाही.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही 30 मिनिटे धावणे किंवा सायकल चालवण्यासारखे व्यायाम केले तर तुमचे आरोग्य सुधारू शकते पण बराच वेळ बसण्याचे परिणाम पूर्णपणे टाळता येत नाहीत. या संशोधनामध्ये साधारण 33 वर्षे वय असलेल्या एक हजाराहून अधिक लोकांचा समावेश होता ज्यात 730 जुळ्या मुलांचा समावेश होता दीर्घकाळ बसून राहण्याचा शरीरावर विशेषतः कोलेस्ट्रॉल आणि बॉडी मास इंडेक्स वर काय परिणाम होतो हे शोधणे या संशोधनाचा मुख्य उद्देश होता.

या अभ्यासातून असे समजले आहे की, जे लोक दिवसातील साडे आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसतात आणि शारीरिक हालचालींसाठी कमी वेळ घालवतात त्यांचे कॉलेस्ट्रॉल आणि BMI चांगले नाही. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कामाच्या दरम्यान नियमित विश्रांती घेणे आणि शारीरिक क्रिया कलाप वाढवणे महत्त्वाचे आहे कामानंतर थोडेसे चालत गेल्याने आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही.

अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डरचे मानसशास्त्र आणि न्यूरो सायन्स विभागातील प्राध्यापक चंद्र रेनॉल्ड्स यांनी सांगितले की दिवसभर कमी बसने, जास्त व्यायाम करणे या दोन्ही मुळे अकाली वृद्धत्वाचा धोका कमी होतो जे लोक नियमितपणे व्यायाम करतात जसे की तीस मिनिटे धावणे किंवा सायकल चालवणे त्यांच्यात कोलेस्ट्रॉल आणि बीएमआय मोजमाप ते पाच ते दहा वर्षे लहान दिसतात. जास्त वेळ बसल्याने होणारी हानी टाळण्यासाठी अधिक शारीरिक हालचालींची गरज आहे.