अनेकांना झोपेची (Sleep) समस्या असते. झोप पूर्ण न झाल्यामुळे इतरही अनेक समस्या निर्माण होतात. झोप पूर्ण न झाल्यामुळे माणूस चिडचिडेपणा करतो. मानसिक दृष्या (Mental Health) स्वस्थ राहण्यासाठी पुरेशाप्रमाणात झोप आवश्यक असते. रात्री व्यवस्थित झोप झाल्यास तुमचा दिवस चांगला जातो. चांगली झोप लागण्यासाठी काय करावे. (Sleep Hygiene Tips) काय काळजी घ्यावी? जेणेकरून तुम्हाला शांत झोप लागेल, व तुमची झोप देखील पूर्ण होईल. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चांगली झोप झाल्यास तुमचा दिवस चांगला जातो. तसेच दिवसभर उत्साह टिकून असल्यामुळे तुमच्या कामाचा वेग देखील चांगला असतो. या उलट जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर तुमच्या अंगात आळस राहातो. त्याचा परिणाम तुमच्या कामावर देखील होतो. त्यामुळे चांगली झोप होणे हे महत्त्वाचे असते.
चांगल्या झोपेसाठी टायमिंग महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या झोपेचा टायमिंग ठरवून घ्या. काहीही झाले तरी त्याच वेळेत तुम्ही झोप घ्या. टायमिंग चुकवू नका. असे केल्यास तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी मदत होईल. तसेच झोपण्यापूर्वी एखादे चांगले गाणे किंवा पुस्तक वाचायची सवय लावा यामुळे देखील तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल. झोपण्यापूर्वी तुम्ही गरम तेलाने तुमच्या डोक्याची मॉलीश देखील करू शकता. मॉलीश केल्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होईल.
तुम्ही दिवसभर काम करून थकता. अनेकदा तुमची मनस्थिती चांगली नसल्यामुळे तुम्हाला चांगली झोप येत नाही. तसेच अति थकव्यामुळे देखील कधीकधी झोप अपूर्ण राहाते. अशा स्थितीमध्ये तुम्ही काही प्रणाण ड्रिंग्सचे सेवन करू शकता. मात्र लक्षात ठेवा की बाजारात मिळणारे ड्रिग्स प्राधान्याने टाळा, घरगुती पेय जसे की लिंबू पानी यासारख्या ड्रिंग्सचा तुम्ही उपयोग करू शकता. झोपण्यापूर्वी कधीही कॉफी किंवा चहा सारख्या उत्तेजक पेयांचे सेवन करू नका. चहा, कॉफीमध्ये असे अनेक घटक असतात की ज्यामुळे झोप नाहीशी होते.
झोपताना तुम्ही फोन बंद करून झोपा. कारण अनेकवेळा कोणाचा कॉल, किंवा मॅसेज येतो. अशा कॉलमुळे तुमची झोप डिस्टप होऊ शकते. तुम्ही झोपलेले आहात आणि कोणाचा अचानक कॉल आला तर तुमची झोपमोड होते. मध्येच झोपमोड झाल्याने झोप अपूर्ण राहाते. त्यामुळे झोपताना नेहमी फोन बंद करूनच झोपा.
रात्री झोपण्यापूर्वी आवश्य करा नारळाचे सेवन, ‘या’ समस्यांपासून मिळेल कायमचा सुटकारा
मुलांमुळे सतत चिडचिड होतेय? सारखं त्यांच्यावर रागवता का? वाचा, ओव्हर पॅरेंटिंग कसं घातक ठरू शकतं?
अनेकांना अचानक बेचैन का वाटतं, काय होतो नेमका त्रास, घ्या जाणून…!