मुंबई : बदलत्या हवामानाचा (Weather) सर्वात जास्त फटका हा लहान मुलांना बसतो. आपण घरामध्ये बघतो की, थोडे जरी वातावणामध्ये बदल झाले की, आपली मुले (Children) लगेचच आजारी पडतात. त्याचे कारणही तसेच आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, यामुळे बदललेल्या हवामानाच परिणाम त्यांच्या आरोग्यावर पडतो. सध्या हिवाळा संपला आहे आणि उन्हाळा लागला आहे. मात्र, दिवसा गरमी होते आणि रात्री अचानक थंडी वाजते. यामुळे लहान मुलांच्या तब्येत बिघडताना दिसत आहेत. यादरम्यानच्या वातावरणामध्ये आपल्या मुलांची काळजी (Care) कशी घ्यावी हे आपण आज मुंबईतील प्रसिध्द डाॅक्टर डॉ. आशिष गाईकवाड यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
लहान मुलांचे प्रमुख आजार-
-सर्दी-खोकला
-वारंवार ताप येणे
-बध्दकोष्ठता
-दमा
-भूक न लागणे
-चिडचिडेपणा
-वारंवार डोकेदुखी
सर्दी-खोकला
मुलांना जास्त करून सर्दी आणि खोकल्याची समस्या अधिक प्रमाणात असते. जेंव्हा मुलांना सर्दी-खोकलाची समस्या निर्माण होते. त्यावेळी त्यांना दररोज सकाळी कोमट पाणी प्यायला द्या. त्यानंतर वाफ द्या. शक्यतो सर्दी-खोकला झाल्यावर मुलांना बाहेरील पदार्थ देणे टाळा.
चिडचिडेपणा
मुलांची तब्येत खराब असेल तर त्यांच्यामधील चिडचिडेपणा अधिक वाढतो. मग अशावेळी त्यांना शांत करण्यासाठी वेगवेगळे गेम वगैरे खेळण्यासाठी त्यांना द्या. जर ते खाताना अधिक चिडचिड करत असतील तर त्यांना थोड्यावेळाने खाऊ घालण्याची प्रयत्न करा.
भूक न लागणे
आजारपणामध्ये कोणालाही जेवण करायचा अजिबात आवडत नाही. मग अशावेळी मुलांना दररोजचे पदार्थ खायला देऊ नका. त्यांना ते आवडणार नाही. मग अशावेळी मुलांना थोडे वेगळी मात्र, हेल्दी खायला द्या. आजार पणामध्ये मुलांच्या आहारामध्ये जास्तीत-जास्त फळांचा समावेश करा.
वारंवार ताप येणे
बऱ्याच वेळा हवामानातील बदलामुळे मुलांना वारंवार ताप येण्याजी समस्या निर्माण होते. अशावेळी मुलांच्या आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. जर ताप थांबतच नसेल तर डाॅक्टरांचा सल्ला लवकर घ्या. उन्हाळ्याच्या हंगामात मुलांना दुपारी अंघोळ घाला.
डोकेदुखी
लहान वयामध्ये अत्यंत कमी वयामध्ये अनेक मुलांना डोकेदुखीची समस्या निर्माण होते. मात्र, लहान मुलांच्या डोकेदुखीची कारणे अनेक असू शकतात. यामध्ये प्रामुख्याने दिसणारे कारणे म्हणजे लहान मुले बऱ्याच वेळ मोबाईलवर गेम वगैरे खेळतात. हे मुलांच्या आरोग्याच्या दष्टीने अत्यंत धोकादायक आहे. यामुळे शक्यतो लहान मुलांना मोबाईल देऊच नका.
संबंधित बातम्या :
कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध हटवले जाणार? केंद्रीय गृह सचिवांचे राज्यांना पत्र