मुंबई : भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. सध्याच्या काळात बाजारामध्ये अनेक पदार्थ भेसळयुक्त आहेत. त्याचे आपण सेवन केल्याने आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. भेसळयुक्त पदार्थ ओळखण्यासाठी अनेक प्रकारचे संशोधने केली जात आहेत. मात्र, नुकताच FSSAI ने दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये भेसळयुक्त हळद आणि लाल मिरची पावडर कसे ओळखायचे यासाठी खास टिप्स देण्यात आल्या आहेत.
सध्या बाजारामध्ये हळद आणि लाल मिरची पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. लाल मिरची पावडरमध्ये वीट बारीक करून मिसळली जात आहे. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तसेच हळदीमध्ये साबणाची पावडर मिक्स केली जात आहे. बऱ्याच वेळा हळदीचा रंग पिवळा दिसण्यासाठी केमिकल वापरले जाते. लाल मिरची पावडर लाल दिसण्यासाठी आरोग्यासाठी हानिकारक असलेले रंग त्यामध्ये मिसळले जाते.
Is your Chilli powder adulterated with brickpowder/sand?#DetectingFoodAdulterants_8#AzadiKaAmritMahotsav@jagograhakjago @mygovindia @MIB_India @AmritMahotsav @MoHFW_INDIA pic.twitter.com/qZyPNQ3NDN
— FSSAI (@fssaiindia) September 29, 2021
भेसळ करणारे लाल मिरची पावडरमध्ये वीट पावडर किंवा वाळू सारख्या गोष्टी वापरतात. हे ओळखण्यासाठी, अर्धा ग्लास पाणी घ्या. त्यात एक चमचा लाल मिरची पावडर मिक्स करा. त्यानंतर दोन मिनिटे थांबा. चमच्याने ग्लासमधील मिरची पावडर बाहेर काढा आणि हातावर टाका. ही पावडर हातावर चोळा. जर ही पावडर खडबड लागली तर समजून घ्या की, ही मिरची पावडर भेसळयुक्त आहे. जर ही पावडर मऊ लागली तर ही मिरची पावडर भेसळयुक्त नाही.
Detecting Artificial Colour Adulteration in Turmeric#DetectingFoodAdulterants_3@MIB_India@PIB_India @mygovindia @MoHFW_INDIA pic.twitter.com/eTJL1wJ9yT
— FSSAI (@fssaiindia) September 1, 2021
भेसळयुक्त हळद ओळण्यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे हळद मिक्स करा. जर हळद ग्लासच्या बुडाला गेली आणि हळदीचा रंग थोडा हलका झाला की, समजून घ्या की, आपली हळद भेसळयुक्त नाहीये. जर हळद पाण्यावर तरंगत राहिली आणि हळदीचा रंग अधिक पिवळा झाला की, समजला ही हळद भेसळयुक्त आहे.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Special tips to identify adulterated chilli powder and turmeric powder)