गर्भवती महिलांना भीतीदायक स्वप्ने का पडतात?; जाणून घ्या कारणं!

| Updated on: Sep 10, 2021 | 11:58 AM

गर्भधारणेदरम्यान स्त्रियांना बऱ्याचवेळा वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडतात. अनेक स्त्रिया म्हणतात की, त्यांना भीतीदायक किंवा तणावपूर्ण स्वप्ने पडतात, ज्यामुळे त्यांचा ताण वाढतो. जर तुमच्यासोबतही असे काही घडत असेल तर जास्त काळजी करण्याची गरज नाही. येथे जाणून घ्या. याचे कारण आणि ही समस्या कशी टाळावी.

गर्भवती महिलांना भीतीदायक स्वप्ने का पडतात?; जाणून घ्या कारणं!
pregnancy
Follow us on

मुंबई : झोपल्यानंतर स्वप्न पडणे ही एक सामान्य गोष्ट आहे. आपल्या सर्वांना चांगली आणि वाईट स्वप्ने पडतात. काही स्वप्ने आपल्याला आठवतात आणि काही आपण विसरतो. पण त्याचे विचार नक्कीच आपल्या मनात राहतात. (Special tips to overcome the problem of dreaming during pregnancy)

परंतु गर्भधारणेदरम्यान स्त्रियांना बऱ्याचवेळा वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडतात. अनेक स्त्रिया म्हणतात की, त्यांना भीतीदायक किंवा तणावपूर्ण स्वप्ने पडतात, ज्यामुळे त्यांचा ताण वाढतो. जर तुमच्यासोबतही असे काही घडत असेल तर जास्त काळजी करण्याची गरज नाही. येथे जाणून घ्या. याचे कारण आणि ही समस्या कशी टाळावी.

हे कारण आहे

खरं तर, गर्भधारणेदरम्यान स्वप्ने खूप मोठ्या प्रमाणात पडतात. तज्ञांच्या मते हार्मोन्समधील चढउतारांमुळे अनेकदा गर्भवती महिलेला स्वप्न पडतात. हार्मोनल बदलांचा स्त्रीच्या शरीरावर खोल परिणाम होतो. याचा परिणाम स्त्रियांच्या स्वप्नांमध्ये दिसून येतो.

झोपेच्या पद्धतीत बदल

हार्मोन्समधील चढउतारांमुळे स्त्रियांना मूड स्विंग, चिंता, थकवा, चिंताग्रस्तपणा सारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे त्याच्या शरीराला शक्य तितक्या विश्रांतीची गरज असते. परंतु त्यांच्या झोपेच्या पद्धतीत पूर्ण बदल होतो. यामुळे जेव्हा त्या झोपतात तेव्हा त्यांच्या मानसिक स्थितीचा परिणाम त्यांच्या स्वप्नांच्या स्वरूपात दिसून येतो आणि त्यांना अस्वस्थ स्वप्ने पडतात.

काय करायचं

तणाव कमी करण्यासाठी आपण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे योग करा. नियमितपणे ध्यान करा. आपल्याला आवडेल तितक्या गोष्टी करण्यात स्वतःला गुंतवा. चांगली पुस्तके वाचा. सकारात्मक राहा. असे म्हणतात की गर्भधारणेदरम्यान स्त्रीची जीवनशैली, तिचा आहार आणि विचारांचा थेट परिणाम तिच्या गर्भातील बाळावर होत असतो.

म्हणून अशावेळी आपले लक्ष नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवून, नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. योग, ध्यान आणि डॉक्टर-निर्देशित व्यायाम नियमितपणे करा. एखाद्या प्रशिक्षकाच्या उपस्थितीत योगा केल्यास अधिक फायदा होईल. याशिवाय नकारात्मक बोलणाऱ्यांपासून अंतर ठेवा. असे केल्याने आपल्याला आनंद होईल, रीफ्रेश वाटेल आणि उत्साह वाढेल.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Special tips to overcome the problem of dreaming during pregnancy)