Stomach infection tips : फूड पॉयझनिंगवर ‘हे’ पाच घरगुती उपाय आहेत रामबाण इलाज

| Updated on: Feb 09, 2022 | 5:30 AM

Food Poisoning relief : कधीकधी चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अन्न विषबाधा होऊ शकते. उलट्या होणे, मळमळ होणे, पोट दुखणे ही अन्न विषबाधेची काही सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच काही घरगुती उपाय देखील करू शकता. ज्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकेल. आज आपण अशाच काही घरगुती उपयांबद्दल जाणून घेणार आहोत, जे अन्न विषबाधेपासून निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यास मदत करतात.

1 / 5
लिंबू : लिंबामध्ये असे अनेक गुणधर्म असतात, ज्यामध्ये पोटाच्या विविध समस्या दूर करण्याची क्षमता असते. तुम्हाला जर फूड पॉयझनिंगची लक्षणे जाणवत असल्यास अर्धे लिंबू आणि थोडे काळे मीठ एक ग्लास पाण्यात मिसळून घेतल्यास आराम मिळतो. लिंबाच्या सेवनाने फूड पॉयझनिंग बॅक्टेरिया नष्ट होतात.

2 / 5
व्हिनेगर : तज्ज्ञांच्या मते, सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये चयापचय वाढवण्यासाठीचे आवश्यक गुणधर्म असतात. व्हिनेगरचे पाणी पिल्याने शरीरातील नको असलेले घटक बाहेर पडातात आणि संबंधित व्यक्तीला लवकर आराम मिळतो.

3 / 5
तुळशीची पाने : तुळशींच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळशींच्या पानाचे नियमित सेवन केल्यास पोटाचे विविध आजार दूर होतात. फूड पॉयझनिंग झाल्यास दह्यामध्ये तुळस मिसळून खावी. दह्याऐवजी तुम्ही तुळसीचा चहाही पिऊ शकता, या उपयांमुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.

4 / 5
दही : दह्यामधील प्रतिजैविक गुणधर्म पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करतात. तसेच फूड पॉयझनिंगच्या वेळी दही खाल्ल्याने आराम मिळतो. तुम्ही काळ्या मिठासोबत देखील दह्याचे सेवन करू शकता.

5 / 5
 जीरे :  पोटात दुखत असेल तर जिरे बारीक चावून खावेत. त्याचबरोबर जीरे भाजून त्यात थोडेसे काळे मिठ टाकून त्याची पूड बनवावी व तिचे थोडे-थोडे नियमित सेवन करावे, असे केल्यास पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. टीप वरील सर्वा माहिती ही सामान्य ज्ञानाच्या हेतून देण्यात आली आहे. कुठलेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.