तोंड येणे ही एक सामान्य समस्या आहे जी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकते. या समस्येमुळे खाण्यापिण्यात अडचण निर्माण होते आणि कधी कधी इतकी वेदना होते की बोलणे ही कठीण होते. ही समस्या गंभीर नसली तरी योग्यवेळी उपचार न केल्याने ही समस्या वाढू शकते. व्हिटॅमिनची कमी, मसालेदार अन्न, पोटाच्या समस्या किंवा खूप गरम अन्न खाल्ल्याने तोंड येण्याची समस्या निर्माण होते. औषधांशिवाय घरगुती उपाय केल्याने देखील ही समस्या दूर करता येते.
नैसर्गिक आणि सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून तोंड येण्यावर उपाय करता येतात. ज्यामुळे केवल हे बरे होत नाही तर वेदना आणि जळजळ कमी होते. जाणून घेवू असे पाच प्रभावी उपाय जे केल्याने तोंड येण्याची समस्या कायमची दूर होईल.
मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो. ज्यामुळे आलेले तोंड लवकर बरे होण्यास मदत होते. हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात ज्यामुळे वेदना, सूज कमी होते. अर्धा चमचा हळदीमध्ये एक चमचा मध मिसळा आणि हे मिश्रण जिथे तोंड आले असेल तिथे लावा आणि दहा मिनिटांनी तोंड धुवा. हे दिवसातून दोन ते तीन वेळा करा.
खोबऱ्याच्या तेलामध्ये दहाक विरोधी आणि बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असतात जे तोंड आल्यावर आराम मिळवून देतात. कापसाच्या मदतीने तोंड आलेल्या ठिकाणी थोडेसे खोबरेल तेल लावा हे दिवसातून दोन ते वेळा अवश्य लावा.
लवंग तेल नैसर्गिक भूल देण्याचे काम करते आणि तोंड आल्यास त्यावर लगेच आराम मिळवून देते. लवंगाचे थोडे तेल कापसावर लावून जिथे तोंड आले आहे त्या भागावर लावा. पाच ते दहा मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर स्वच्छ तोंड धुवा. हे दिवसातून एक वेळ लावा.
कोरफड मध्ये थंड करण्याचे गुणधर्म आहेत. जे तोंड आल्यावर होणाऱ्या वेदना आणि जळजळ कमी करतात. कोरफडीच्या ताज्या पानांपासून त्याचा गर काढा. हा गर तोंड आलेल्या भागावर दिवसातून दोन ते तीन वेळा लावा.
थंड पाणी आणि बर्फामुळे वेदना आणि सूज लगेच कमी होते. बर्फाचा तुकडा घ्या आणि तोंड आलेल्या भागावर हलक्या हाताने फिरवा. थंड पाणी पिल्याने देखील आराम मिळतो. हे दिवसातून तुम्ही कितीही वेळा करू शकता.