Kidney Disease | वेळीच ओळखा किडनीचा आजार! वाचा काय आहेत लक्षणे

| Updated on: Aug 14, 2023 | 1:25 PM

किडनीच्या कार्यात थोडीशी अडचण आली तर त्याचा परिणाम लघवीच्या रंगात स्पष्टपणे दिसून येतो. यामध्ये लघवीचा रंग गडद पिवळा, लघवीत फोम, वारंवार लघवी होणे असा त्रास होतो. अशावेळी ताबडतोब लघवीची तपासणी करून घ्या.

Kidney Disease | वेळीच ओळखा किडनीचा आजार! वाचा काय आहेत लक्षणे
kidney disease symptoms
Follow us on

मुंबई: किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर आपण आजारी पडू शकतो, तसेच किडनीत वेदना होऊ शकतात. अनेकदा किडनी निकामी झाल्यामुळे मशिनद्वारे डायलिसिस करावे लागते, तरच विषारी पदार्थ शरीराबाहेर पडू शकतात. किडनीच्या आजाराची मोठी समस्या म्हणजे हा आजार खूप उशीरा ओळखला जातो. मात्र, काही महत्त्वाच्या लक्षणांद्वारे किडनीच्या आजाराचा धोका वेळीच ओळखता येतो.

किडनीच्या आजाराची लक्षणे

लघवीच्या रंगात बदल: किडनीच्या कार्यात थोडीशी अडचण आली तर त्याचा परिणाम लघवीच्या रंगात स्पष्टपणे दिसून येतो. यामध्ये लघवीचा रंग गडद पिवळा, लघवीत फोम, वारंवार लघवी होणे असा त्रास होतो. अशावेळी ताबडतोब लघवीची तपासणी करून घ्या.

थकवा: जेव्हा किडनीची समस्या उद्भवते तेव्हा शरीरात लोह आणि अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची कमतरता असते. त्याचबरोबर लाल रक्तपेशीही तयार होणे कमी होते. लाल पेशी रक्तातील ऑक्सिजनची पातळी टिकवून ठेवतात. हेच कारण आहे की आरबीसीच्या कमतरतेमुळे आपल्याला थकव्याला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे थकवा जाणवतोय का याकडे लक्ष असुद्या.

तोंडातून दुर्गंध येणे: तोंडाची आणि दातांची स्वच्छता न करणे, कांदा-लसूण खाणे अशी अनेक कारणे तोंडाच्या दुर्गंधीमागे असू शकतात. पण यातलं काहीच तुम्ही करत नसाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. ही किडनीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

त्वचारोग: किडनीचे कार्य व्यवस्थित न झाल्याने शरीरात घाण जमा होऊ लागते. ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही स्पष्टपणे दिसून येतो. अशावेळी इन्फेक्शनचा धोका वाढतो, तसेच शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)