Weight Loss Tips : सफरचंदपासून बदामापर्यंत वजन कमी करण्यासाठी 5 सर्वोत्तम पदार्थ! जाणून घ्या अधिक!

| Updated on: Sep 11, 2021 | 7:37 AM

वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम कमी चरबीयुक्त पदार्थ आणि साखर नसलेले पेय आहारामध्ये घेतो. या दरम्यान, आपण आहारात अशा पदार्थांचा समावेश देखील करू शकता, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळापर्यंत भूक लागत नाही. नेमके कोणते पदार्थ आपण आहारामध्ये घेतले पाहिजेत.

Weight Loss Tips : सफरचंदपासून बदामापर्यंत वजन कमी करण्यासाठी 5 सर्वोत्तम पदार्थ! जाणून घ्या अधिक!
आरोग्य
Follow us on

मुंबई : लठ्ठपणा ही आजकाल एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे बहुतेक लोक लहान वयातच विविध आजारांना बळी पडत आहेत. हेच कारण आहे की आजकाल प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. वजन कमी करताना आपण आपल्या आहार आणि जीवनशैलीची खूप काळजी घेतो. (Take these 5 special foods in your diet to lose weight)

वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम कमी चरबीयुक्त पदार्थ आणि साखर नसलेले पेय आहारामध्ये घेतो. या दरम्यान, आपण आहारात अशा पदार्थांचा समावेश देखील करू शकता, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळापर्यंत भूक लागत नाही. नेमके कोणते पदार्थ आपण आहारामध्ये घेतले पाहिजेत. ज्यामुळे आपल्याला बराच वेळ भूक लागणार नाही, हे आज आपण बघणार आहोत.

सफरचंद – दररोज सफरचंद खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. विशेष म्हणजे सफरचंद कमी कॅलरीयुक्त फळ आहे. जे फायबर समृद्ध आहे. जे आपले पाचन आरोग्य नियंत्रित ठेवते, आपल्याला जास्त काळ तृप्त ठेवते आणि भूक कमी करते, ज्यामुळे दिवसभर आपले पोट भरलेले राहते.

मिरची – एका अभ्यासानुसार, मिरचीमध्ये आढळणारे घटक कॅप्सॅसिन वजन कमी करण्यास मदत करू शकते. जेवणात हे घटक घेतल्यावर बराच वेळ आपल्याला भूक देखील लागत नाही. हे तुम्हाला उच्च-कॅलरी स्नॅक्स खाण्यापासून प्रतिबंधित करते. हे चयापचय सुधारण्यासाठी देखील ओळखले जाते. जे वजन कमी करण्याची प्रक्रिया जलद करण्यास मदत करते.

ओटमील – शुगर फ्री ओटमील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ओटमील खाल्ल्याने आपले पोट बराच वेळ भरलेले राहते. ओटमीलमधील कार्बोहायड्रेट्स संथ गतीने ऊर्जा सोडतात, जे चरबी जमा होण्यापासून प्रतिबंधित करते.

बदाम – बऱ्याच लोकांना असे वाटू शकते की बदाम चरबीयुक्त असतात. आणि ते वजन कमी करण्यासाठी योग्य नसतात. तथापि, अभ्यासानुसार, बदाम हे निरोगी चरबीचे चांगले स्त्रोत आहेत. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील चांगले आहेत.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Take these 5 special foods in your diet to lose weight)