मुंबई : कमी रक्तदाब दरम्यान रक्तदाब पातळी खाली येते. ही परिस्थिती सामान्यतः तणाव, गर्भधारणा, काही औषधांचे दुष्परिणाम, खाण्याच्या सवयी, डिहायड्रेशन आणि अशक्तपणा, पौष्टिक कमतरता, कमी मीठाचे सेवन किंवा एलर्जीक प्रतिक्रियांमुळे होते. या स्थितीमुळे मेंदू, मूत्रपिंड आणि हृदयाचे नुकसान देखील होऊ शकते. आपण कमी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी कोणते घरगुती उपचार करू शकता ते जाणून घेऊया.
मिठाचे पाणी
मीठामध्ये सोडियम असते, जे रक्तदाब पातळी त्वरित वाढवण्यास मदत करते. हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे की जास्त सोडियमचे सेवन केल्याने पोटात अल्सर, मूत्रपिंडातील दगड आणि शरीरात जळजळ देखील होऊ शकते. एक ग्लास पाण्यात दीड चमचे मीठ मिसळा आणि आठवड्यातून एकदा प्या.
दूध आणि बदाम
दूध आणि बदाम, दोन्ही आपली रक्तदाब पातळी नियंत्रित आणि सामान्य करण्यात मदत करू शकतात. फक्त पाच ते सहा बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यांना सोलून जाडसर पेस्ट करण्यासाठी बारीक करा. ते एक ग्लास दुधात उकळून रोज सकाळी प्या.
तुळशीची पाने
तुळशीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तुळशीची पाने रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. या पानांमध्ये युजेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट देखील असते. जे रक्तदाब राखण्यास मदत करते आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करते.
कॅफीन
तुम्ही सकाळी एक कप काॅफी पिऊ शकता. तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात एक मजबूत कप ब्लॅक कॉफी समाविष्ट करा. यामुळे कमी रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
बीटचा रस
कच्चे बीट रक्तदाब राखण्यास मदत करू शकते. या निरोगी भाजीचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करा. सॅलडमध्ये काही कच्चे बीट खा. आपल्या भाज्या किंवा फळांच्या स्मूदीमध्ये घाला. सकाळी दोन ग्लास साध्या बीटचा रस प्यायल्याने कमी रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते.
मनुके
मनुके अँटी-ऑक्सिडंट जीवनसत्त्वे आणि फायबरने समृद्ध असतात. जे रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी मूठभर मनुके पाण्यात भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी ते मनुके खा आणि ते पाणी प्या. यामुळे रक्तदाब पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Take this home remedy to get rid of the problem of low blood pressure)