कोरोनाची लक्षणे जाणवल्यास घरीच उपचार कसे कराल?; केंद्रीय आरोग्य विभाग म्हणतंय ‘हे’ करा!

| Updated on: May 07, 2021 | 6:54 PM

देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाने आज पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती जारी केली आहे. (The Health Ministry says, How To Treat Covid patient In Home Isolation)

कोरोनाची लक्षणे जाणवल्यास घरीच उपचार कसे कराल?; केंद्रीय आरोग्य विभाग म्हणतंय हे करा!
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us on

नवी दिल्ली: देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाने आज पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती जारी केली आहे. यावेळी राज्यातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ताप, गळ्यातील खवखव, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कोरोना समजूनच घरच्या घरी उपचार करा. त्याशिवाय चव कळत नसेल तर तुम्हाला करोना आहे हे समजून जावं, असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. (The Health Ministry says, How To Treat Covid patient In Home Isolation)

तुम्हाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ स्वत:ला घरात क्वॉरंटाईन करा. त्यानंतर लगेच कोरोनाची चाचणी करून घ्या. कोरोना चाचणीचा अहवाल यायला उशीर होत असेल तर कोरोना समजूनच उपचार करणे सुरू करा. जर ऑक्सिजन लेव्हल कमी होत असेल तर तातडीने उपचार घ्या, असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

काय करावं?

तुम्हाला कोरोनाची लक्षणे आहेत किंवा कोरोना संक्रमित असाल तर घरीच राहा. तसेच सरकारने ज्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन उपचार घ्या. तसेच तुमच्या आसपास साफसफाई ठेवा. होम केअरमध्ये विलगिकरणात राहणं सर्वात महत्त्वाचं आहे. तसेच होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांनीही मास्क वापरणं गरजेचं आहे. बाधित व्यक्तीने सर्जिकल मास्क किंवा एन-95 मास्क वापरलं तर अधिक चांगलं राहिल.

गृहविलगिकरणात असेल तर घरात चांगलं व्हेंटिलेशन असावं. त्याशिवाय तुम्हाला ताप सतत चेक करत राहा. ताप असेल तर पॅरासिटेमॉल गोळी घ्या. तर ऑक्सिजन लेव्हल 93च्या खाली असेल तर डॉक्टरशी संपर्क करा. त्याशिवाय श्वासोच्छासावर लक्ष ठेवा, असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

उपचार

तुम्हाला कोरोनाच संसर्ग असेल तर तुम्हाला केवळ लिक्विड घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. पाणी, लस्सी आदींचा या पातळ पदार्थांमध्ये समावेश आहे. झोपताना पोटावर झोपावं. ताप आला असेल तर औषध घ्या. खोकला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन पातळ औषध घेऊ शकता. त्याशिवाय मल्टिव्हिटॅमिनही घेऊ शकता आणि स्टिमही घेऊ शकता, असंही आरोग्य विभागाने सांगितलं आहे. (The Health Ministry says, How To Treat Covid patient In Home Isolation)

 

संबंधित बातम्या:

कोरोनाची तिसरी लाट रोखली जाऊ शकते? केंद्राच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सांगितला उपाय

कोरोनाची लाट किती दिवस राहणार?, काय केले पाहिजे?; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात

“शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93 पर्यंत घसरणे चिंताजनक नाही, पण….”, एम्स रुग्णालयाची नवी माहिती

(The Health Ministry says, How To Treat Covid patient In Home Isolation)