जगात कोरोना सारख्या महामारीमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर कोरोनावरील वॅक्सीन येईपर्यंत जगभरातील लोकं जीव मुठीत घेऊन जगत होती. कोरोना विषाणू मुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. कोरोनामुळे आजही लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरोना जरी गेला असला तरी इतर आजारांना तो देऊन गेलाय. त्यातच आता नव्या विषाणूने जगाच्या चिंता वाढवल्या आहे. डोळ्यातून रक्तस्त्राव होणारा हा विषाणू आहे. यामुळे डोळ्यांतून रक्तस्त्राव होतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. हा एक गंभीर आजार मानला जात आहे. 17 देशांमध्ये मारबर्ग, Mpox आणि Oreopoche विषाणूंचा संसर्ग वाढल्यामुळे आणखी एक समस्या वेगाने वाढू लागली आहे. रवांडामध्ये आतापर्यंत या गंभीर विषाणूमुळे 15 लोकांचा मृत्यू झालाय तर शेकडो लोकांना याची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जगभरात नवीन संकट घेऊन आलेल्या या विषाणूनला ब्लिडिंग आय व्हायरस असेही म्हणतात. हा विषाणू नेमका काय आहे. तो आपल्या डोळ्यांना हानी कसा पोहोचवू शकतो. यापासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
या विषाणूच्या संसर्गामुळे डोळ्यातून रक्तस्त्राव होतो. याला वैज्ञानिक भाषेत हेमोरेजिक कंजक्टिवाइटिस असेही म्हणतात. हे एक प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन आहे. यामुळे डोळ्यांतून रक्तस्त्राव होण्याची लक्षणे दिसू शकतात. डोळ्यांच्या पांढऱ्या भागात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. हा विषाणूची इतरांना ही संसर्ग होऊ शकतो.
मारबर्ग विषाणू किंवा ब्लिडिंग आय व्हायरसची लक्षणे 2 ते 20 दिवसांत दिसू शकतात. या विषाणूची लागण झाल्यानंतर डोळ्यांमध्ये तीव्र जळजळ आणि खाज सुटणे, डोळ्यांच्या पांढऱ्या भागात लालसरपणा किंवा रक्ताची गुठळी तयार होते. अंधुक दृष्टी, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ किंवा उलट्या आणि सौम्य ताप अशी लक्षणे देखील यामध्ये दिसू शकतात.
या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी साबण आणि पाण्याने वारंवार हात स्वच्छ करणे महत्वाचे आहे. घाण हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळले पाहिजे. डोळे आणि चेहरा धुतल्यानंतर स्वच्छ टॉवेल आणि रुमालाने ते पुसावे. संक्रमित व्यक्तीपासून दूर राहिले पाहिजे. फक्त डॉक्टरांनी शिफारस केलेले औषधंच वापरली पाहिजेत. कोणतेही डोळ्याचे ड्रॉप वापरु नयेत. कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्मा लावत असाल तर ते वारंवार स्वच्छ करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.